शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लग्न म्हणजे पत्नीनं शरीरसंबंधासाठी नेहमी होकार देणे असे नव्हे - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 09:21 IST

कोणत्याही महिलेनं आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांसाठी होकारच द्यावा, असा लग्नाचा अर्थ होत नाही, असे दिल्ली हायकोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

नवी दिल्ली - कोणत्याही महिलेनं आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांसाठी नेहमी होकारच द्यावा, असा लग्नाचा अर्थ होत नाही, असे दिल्ली हायकोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. लग्नासारख्या नात्यामध्ये पुरुष आणि महिला दोघांनाही शारीरिक संबंधांना नकार देण्याचा अधिकार आहे, असा निकाल मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी हरि शंकर यांच्या खंडपीठानं दिला आहे. 

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं हा निर्णय दिला आहे. खंडपीठानं असंही म्हटलं की, लग्नाचा अर्थ शारीरिक संबंधांसाठी प्रत्येक वेळेस महिलेनं तयार, इच्छुक असावंच असा होत नाही. महिलेनं शारीरिक संबंधांसाठी सहमती दर्शवली आहे, हे पुरुषांना सिद्ध करावं लागले.  

मेल वेलफेअर ट्रस्ट या एनजीओने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत हायकोर्टाने आपला निकाल सुनावला आहे. या याचिकेत असे नमूद करण्यात आले होते की, पती-पत्नीमधील नात्यातील लैंगिक अत्याचारात बळाचा वापर, धमकी दिलेली असणे महत्त्वाचे आहे. वैवाहिक अत्याचाराला अपराध मानणाऱ्या याचिकेला याद्वारे विरोध करण्यात आला होता. यावर हायकोर्टाने म्हटले की, बलात्कारासाठी शारीरिक बळाचा वापर आवश्यक आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. बलात्कारामध्ये जखमी होणे गरजेचे नाही. बलात्काराची व्याख्या आज बदलली आहे. 

एनजीओच्या याचिकेत म्हटले होते की, कायद्यानुसार लग्नानंतर पत्नीला लैंगिक अत्याचारामध्ये संरक्षण देण्यात आले आहे. यावर हायकोर्टाने म्हटले की, जर इतर कायद्यांमध्ये याचा समावेश असेल तर भारतीय दंडसंहिता 375 मध्ये अपवाद कशाला असायला हवा. या कायद्यानुसार, कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे बलात्कार नाही.

'18 वर्षांखालील पत्नीशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कारच'दरम्यान, 18 वर्षांखालील पत्नीशी शरीर संबंध ठेवणे हा गुन्हा असून त्याला बलात्कार समजलं जाईल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तरीही बलात्काराच्या प्रकरणात संबधित भारतीय दंडसंहिता 375 मध्ये एक अपवाद  आहे. त्यानुसार विवाहांतर्गत बलात्कार हा गुन्हा समजण्यात आलेला नाही. म्हणजे पती आपल्या पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी शरीर संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा ठरत नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारmarriageलग्न