शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Manish Sisodia Delhi Liquor Scam: ९० ते १०० कोटींची लाच मिळणार होती? मनिष सिसोदियाच दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 15:10 IST

Manish Sisodia Delhi Liquor Scam: मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालायने अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे.

Manish Sisodia Delhi Liquor Scam: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना दिल्लीउच्च न्यायालयाकडून जोरदार झटका बसला आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मनिष सिसोदियाच मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. मनिष सिसोदिया यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे. 

दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या ३४ पानी निकालात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मनिष सिसोदिया असून, त्यांना सुमारे ९० ते १०० कोटी रुपये लाच म्हणून देण्यात येणार होते, असा दावा सीबीआयने केला होता. तसेच या मद्य घोटळ्यात मनिष सिसोदिया यांचा सक्रीय सहभाग होता, असे निरीक्षण न्यायालायाने नोंदवले आहे. विशेष न्या. एम. के. नागपाल यांनी मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.  १७ एप्रिलपर्यंत मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढण्यात आली आहे.

सीबीआयला योग्य वाटल्यावरच सिसोदिया यांना अटक केली

विशेष न्या. एम.के.नागपाल यांनी म्हटले आहे की, सर्व पुरावे मनिष सिसोदिया यांच्याविरोधात आहेत. मनिष सिसोदिया भ्रष्टाचारात सामील होते, हेच या पुराव्यांवरून सूचित होते. सिसोदिया यांना अटक करून सीबीआयने कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच या प्रकरणी कोणत्याही आदेशाची अवहेलना केलेली नाही. न्यायालयाचा अवमानही केलेला नाही. सीबीआयसला जेव्हा आवश्यक वाटले, तेव्हाच त्यांनी सिसोदिया यांना अटक केली, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

मोजक्या ब्रॅण्ड्सना फायदा करून देण्याचा सिसोदियांचा प्रयत्न

मनिष सिसोदिया यांनी काही मोजक्या ब्रॅण्ड्सना फायदा करून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सिसोदिया यांनी सर्व नियम डावलले. दक्षिणेतील लॉबीशी असलेला संबंध हा या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. या मद्य घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. याचा प्रभाव अनेकांवर पडणार आहे. याचा विचार सिसोदिया यांनी केला नाही. तसेच यामुळे सामान्य माणसांवर मोठा परिणाम होऊ शकतो, ही बाबही विचारात घेतली नाही, असे न्यायालायने म्हटल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज मंजूर करता येणार नाही. सिसोदिया यांना जामीन मंजूर केल्यास बाहेर पडल्यावर या प्रकरणाशी संबंधित गोष्टींमध्ये ते छेडछाड करण्याचा प्रयत्न करू शकतात. महत्त्वाच्या बाबींवर प्रभाव पाडू शकतात. अद्यापही मद्य घोटाळ्याचा तपास पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत सिसोदिया यांना सोडणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने म्हटल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मनिष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय