शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांना उच्च न्यायालयाचे समन्स; ३ आठवड्यांत उत्तर द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 07:00 IST

दिल्ली मेडिकल असोसिएशनची याचिका

नवी दिल्ली : योग गुरु बाबा रामदेव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी समन्स बजावले. बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथिक औषधांविरोधात केलेली कथित विधाने आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोविड-१९ बरा होतो, या केलेल्या दाव्यावरून त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर ही नोटीस दिली गेली आहे.न्यायालयाने बाबा रामदेव यांना कोणतीही बंधने घालण्यास नकार दिला. न्यायालयाचे म्हणणे असे होते की ॲलोपॅथिक शाखा ही काही इतकी नाजूक नाही.बाबा रामदेव यांनी कोणतीही प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत, असे त्यांना सांगा, असे न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांनी त्यांचे वकील राजीव नायर यांना तोंडी सांगितले. दिल्ली मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना समन्स बजावून आपले म्हणणे तीन आठवड्यात सादर करण्यास सांगितले. यावर आता १३ जुलै रोजी सुनावणी होईल. खंडपीठाने ट्विटर आणि फेसबुक ही समाजमाध्यमे आणि आस्था वाहिनीलाही समन्स बजावले आहे. ही तर दिशाभूल : कोरोना विषाणूला काेरोनिल औषध बरे करीत नाही, त्यामुळे बाबा रामदेव यांचे विधान दिशाभूल करणारे आहे, असे डीएमएने आपल्या सदस्य डॉक्टरांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले. बाबा रामदेव यांच्या विधानांनी डीएमएवर कसा परिणाम केला, असे न्यायालयाने विचारल्यावर डीएमएचे वकील राजीव दत्ता म्हणाले,“त्या औषधाने कोरोना विषाणू बरा होत नाही आणि ही याचिका डॉक्टरांच्या नागरी हक्कांसाठी आहे.” 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्या