शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

फोन तोडू नका, चॅट अन् कॉल लॉग डिलीट करू नका; जस्टिस वर्मांना सरन्यायाधीशांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 09:58 IST

Supreme Court: जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Justice Yashwant Varma Case: दिल्लीउच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा  यांच्या घरात कोट्यवधी रुपयांची रक्कम जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. होळीदरम्यान लागलेल्या आगीत ही रक्कम जळाल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, आता या प्रकरणाशी संबंधित खटल्याची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक केली आहेत. यामध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) आणि दिल्लीउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJ) यांच्यातील पत्रव्यवहार, तसेच न्यायमूर्ती वर्मा यांच्या उत्तराचाही समावेश आहे. 

कागदपत्रांनुसार 14 मार्चच्या रात्री न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानातून आग लागल्याचा पीसीआर कॉल करण्यात आला, परंतु अग्निशमन दलाला स्वतंत्रपणे माहिती देण्यात आली नाही. 15 मार्च रोजी सकाळी दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या घटनेची माहिती दिली. त्यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लखनौमध्ये होते.

आग विझविण्यासाठी आलेल्या अग्नीशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांना वर्मांच्या सरकारी निवासस्थानात मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या. पोलिस आयुक्तांनी अर्ध्या जळालेल्या नोंटाचा फोटो आणि व्हिडिओ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पाठवले. पुढे वर्मांच्या बंगल्यातील एका सुरक्षा रक्षकाने 15 मार्च रोजी खोलीतून सर्व कचरा साफ केल्याची माहिती दिली होती.

वर्मांचा कट रचल्याचा आरोप सरन्यायाधीशांनी या संदर्भात न्यायमूर्ती वर्मा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी रोख रकमेशी संबंधित कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टपणे नाकारले. ते म्हणाले की, ज्या खोलीत नोटा सापडल्या, ती खोली आमच्या एकट्याच्या वापरात नव्हती, तर इतर अनेक लोक वापरत होते. मात्र, यासंदर्भातील व्हिडीओ फुटेज त्यांना दाखविले असता, त्यांनी हे आपल्याविरुद्ध रचले गेलेले कट असल्याचे म्हटले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून सरन्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना औपचारिक पत्र लिहून सखोल तपासाची गरज असल्याचे सांगितले आणि सविस्तर तपासाची शिफारस केली.

या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार न्यायमूर्ती वर्मा यांच्या गेल्या सहा महिन्यांतील कॉल रेकॉर्डचा शोध घेण्यात आला. तसेच, त्यांना त्यांचा न तोडण्याचे आणि कोणत्याही चॅट किंवा डेटा न डिलीट करण्याच्या कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण सत्य समोर यावे यासाठी न्यायपालिका व प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण