दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:10 AM2020-06-16T11:10:30+5:302020-06-16T11:14:38+5:30

सत्येंद्र जैन यांची कोरोना व्हायरसची टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे. 

Delhi Health Minister Satyendra Jain admitted to hospital after covid-like symptoms, put on oxygen | दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 42 हजारांच्या पुढे गेली असून 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. मंगळवारी त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांची कोरोना व्हायरसची टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकांना उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकीत सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.


गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र, त्यांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केले.

दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 42 हजारांच्या पुढे गेली असून 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभमूमीवर मंत्र्यांच्या अनेक स्तरावर बैठका सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत दिल्लीतील बैठक घेतली होती. यानंतर अमित शहा यांनी महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कोरोनाबद्दल चर्चा केली. या बैठकीला लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते. बैठकीत दिल्लीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
 

आणखी बातम्या....

"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती

Web Title: Delhi Health Minister Satyendra Jain admitted to hospital after covid-like symptoms, put on oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.