शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पीडित कुटुंबास दिल्ली सरकारची आर्थिक मदत; आरोपीविरुद्ध नामवंत वकीलही देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:32 IST

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपीला बुलंदशहरातून अटकही केली असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता, या घटनेची केंद्र आणि राज्य सरकारनेही दखल घेतली आहे. पंतप्रधानांनी आदेश दिल्यानंतर खासदार हंस राज हंस यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तर, दिल्ली सरकारनेही आर्थिक मदत केली आहे. 

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. येथील खासदार हंसराज हंस यांनी पीडित कुटुंबाची घरी जाऊन भेट घेत सांत्वन केलं. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी मला आदेश दिले होते, असे म्हणत हंस यांनी पीडित कुटुंबास धीर देण्यासाठी आपण इथे आल्याचे सांगितले. तसेच, आर्थिक मदतही केली. आता, दिल्ली सरकारनेही पीडित कुटुंबास आर्थिक मदत जाहीर केली आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही साक्षी हत्याकांडाची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली सरकार कोर्टातून दोषी ठरल्यानंतर दोषीला कडक शिक्षा देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, त्यासाठी सरकारच्यावतीने मोठ्यात-मोठा वकील देणार असल्याचंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलंय. तसेच, पीडित कुटुंबास १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहितीही केजरीवाल यांनी ट्विटरवरुन दिली. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी आज पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. या कठिण काळात आम्ही सर्वजण आपल्यासमेवत आहोत, असे म्हणत अतिशी यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला. 

खासदार हंस यांनीही घेतली भेट

आम्ही राजकारणापलिकडे मुलीचे वडिलही आहोत, मुली आम्हालाही आहेत. जेव्हा व्हिडिओ पाहिला, ज्याला काळीज आहे, ज्याला स्वत:ची मुलगी आहे, म्हणूनच पंतप्रधानही स्वत: भावूक झाले, ते मुलींच्याबाबतीत अशी बातमीही ऐकू शकत नाहीत. त्यांनी आदेश दिला, गृहमंत्र्यांनीही आदेश दिला, आमचे राज्यातील प्रभारी कालपासून झोपले नाहीत, मग आपण कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलो आहोत, अशा रितीने वरिष्ठ पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेतल्याची माहिती खासदार हंसराज हंस यांनी दिली. तसेच, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही अहिर यांनी केली.  

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय