शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", खासदार गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:20 IST

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

delhi floods 2023 : देशाची राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सोमवारपासून यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशा स्थितीत आज सकाळी हातिनीकुंड बॅरेजमधून १ लाख ५३ हजार ७६८ क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर यमुनेच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांवर मोठे संकट ओढावले आहे. स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी इतर भागात स्थलांतरित होत आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने बुधवारी दुपारी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

गौतम गंभीरने लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर मदत पोहचवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपा खासदाराने आम आदमी पार्टीवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना गंभीरने म्हटले, "आम आदमी पार्टीने मागील ९ वर्षे केवळ आरोपांचे राजकारण केले आहे. त्यांनी दिल्लीतील पायाभूत सुविधांवर एक पैसाही खर्च केला नाही, फक्त सोयीचे राजकारण केले, घरे बांधण्याचे राजकारण केले, लोकांना मूर्ख बनवण्याचे राजकारण केले. आता ते बाहेर येत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही 100MM पावसाची तयारी केली होती, पण तो 150MM झाला. 'आप'चे नेते फक्त त्यांचे फोटो काढण्यासाठी पाण्याच्या मध्यभागी जाऊन उभे राहतात. त्यांनी इथे येऊन लोकांची अवस्था पाहायला हवी."

पावसाचा हाहाकार  उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरdelhiदिल्लीBJPभाजपाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालfloodपूर