दिल्ली - परदेशी महिला बलात्कार प्रकरणी पाच आरोपी दोषी
By Admin | Updated: June 6, 2016 14:48 IST2016-06-06T14:46:58+5:302016-06-06T14:48:22+5:30
परदेशी महिला बलात्कार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जणांना सामूहिक बलात्कार, चोरी आणि अपहरणाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे

दिल्ली - परदेशी महिला बलात्कार प्रकरणी पाच आरोपी दोषी
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 06 - परदेशी महिला बलात्कार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 जणांना सामूहिक बलात्कार, चोरी आणि अपहरणाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. 2014मध्ये डॅनिश महिलेवर बलात्कार करण्यात आला होता.
या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवलं असून 9 जूनला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. महेंद्र उर्फ गंजा, मोहम्मद राजा, राजू, अर्जून आणि राजू चक्का अशी आरोपींची नावे आहेत. 14 जानेवारी 2014 मध्ये चाकूचा धाक दाखवत डॅनिश महिलेवर बलात्कार करुन तिला लूटण्यात आलं होतं.