शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा निष्फळ ठरल्यास शेतकऱ्यांचा पुढचा प्लान काय? जाणून घ्या...

By मोरेश्वर येरम | Updated: December 6, 2020 11:06 IST

९ डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. 

ठळक मुद्दे९ डिसेंबर रोजी होणार शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकचर्चा निष्फळ ठरल्यास शेतकऱ्यांची पुढील रणनिती तयारदिल्लीच्या सर्व सीमा सील करण्याचा शेतकऱ्यांचा इरादा

नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. २६ नोव्हेंबर रोजी सुरू झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आज ११ व्या दिवशी देखील सुरुच आहे. केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. यानंतर ९ डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. 

आंदोलक शेतकरी ९ डिसेंबर नंतरच्या रणनितीवर देखील काम करत आहेत. जर सरकारने ९ डिसेंबर रोजी देखील आडमुठी भूमिका कायम ठेवली तर दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्याची रणनिती शेतकऱ्यांनी आखली आहे. शेतकऱ्यांचे याआधीच सिंघू सीमा, टिकरी सीमा आणि गाजीपूर सीमेवर ठिय्या आंदोलन सुरू आहे. सर्व शेतकरी आंदोलन ठिकाणी राहण्याच्या उद्देशाने लागणारं सर्व सामान सोबत घेऊन आले आहेत. याशिवाय स्थानिक संस्था देखील शेतकऱ्यांना मदत करत आहेत. 

१० डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्रकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये ९ डिसेंबर रोजी होणारी चर्चा निष्फळ ठरली. तर १० डिसेंबरपासून दिल्लीसाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं. दिल्लीच्या सर्व सीमांवर घेराव घालण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. सिंघू सीमेसह यापुढील काळात लोनी सीमा, गाजीपूर आणि दिल्ली-नोएडा सीमा देखील बंद करण्याचा शेतकऱ्यांचा इरादा आहे. असं झाल्यास दिल्लीत हाहाकार उडू शकतो. 

दिल्लीच्या जवळपास १.५ कोटी जनतेला दररोज दूध, भाजी, फळं आणि इतर वस्तूंची वाहतूक उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून होते. शेतकऱ्यांनी जर दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या तर दिल्लीकरांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीPunjabपंजाबHaryanaहरयाणाBJPभाजपा