Delhi Exit Poll 2025: दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. यानंतर आता 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल आणि दिल्लीतील जनतेने सत्तेची चावी कुणाच्या हाती दिली हे स्पष्ट होईल. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस हे तीनही पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. दरम्यान, मतदान संपल्यानंतर आता विविध एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत. पपल्स पल्स आणि कोडमो यांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये 27 वर्षांनंतर पुन्हा भाजप सत्तेत येत असल्याचे भाकीत केले आहे.
पीपल्स पल्स आणि कोडमो यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये 51 ते 60 जागांसह भाजप विजयी होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव होऊ शकतो आणि आपच्या जागा 20 पेक्षाही कमी होऊ शकतात. तसेच, काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाजही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
matrize एक्झिट पोल-बीजेपीः 35-40 सीटआपः 32-35 सीटकाँग्रेसः 2-3
चाणक्य एक्झिट पोल -बीजेपीः 39-44 सीटआपः 25-28 सीटकाँग्रेसः 2-3 सीट
पोल डायरी एक्झिट पोलबीजेपीः 42-50 सीटआपः 18-25 सीटकाँग्रेसः 0-2 सीट
पीपल्स इनसाइड एक्झिट पोलबीजेपीः 40-44 सीटआपः 25-29 सीटकाँग्रेसः 0-1।
पी-मार्क एक्झिट पोलआप: 21-31बीजेपी: 39-49कांग्रेस: 0-1