शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनीष सिसोदियांनंतर KCR यांच्या मुलीचा नंबर, अटक होणार; भाजपा नेत्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:58 IST

अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर तेलंगणा भाजपाचे नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे.

नवी दिल्ली-

अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर तेलंगणा भाजपाचे नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. सिसोदिया यांच्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के.कविता यांना लवकरच अटक केली जाईल, असं विधान विवेक व्यंकटस्वामी यांनी केलं आहे. 

"मद्य अबकारी कराच्या घोटाळ्यासंदर्भात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. के.कविता यांनाही लवकरच अटक केली जाईळ. पंजाब आणि गुजरात निवडणुकीवेळी के.कविता यांनी आम आदमी पक्षाला १५० कोटी रुपयांची मदत केली होती", असा आरोप भाजपा नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी केला आहे. 

के.कविता यांच्याकडे मद्य कंपनीची हिस्सेदारीसक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात केसीआर यांच्या मुलीचं नाव घेतलं होतं. यात कविता यांच्या नावावर एका मद्य कंपनीत ६५ टक्के भागीदारी असल्याचा आरोप करण्यात आला होता. केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत विवेक यांनी आगामी काळात सत्ताधारी पक्ष तेलंगणातील आपलं अस्तित्व गमावून बसेल असा दावा केला आहे. 

भाजप नेत्याने दावा केला की तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्ष जेव्हा लॉन्च झाला तेव्हा त्याच्याकडे निधी नव्हता. आता या पक्षाकडे देशातील सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त भांडवल जमा झाले आहे. हा पैसा कुठून आला, असा सवाल भाजप नेत्याने उपस्थित केला. केसीआर यांनी निवडणुकीदरम्यान दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, अशीही टीका व्यंकटस्वामी यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपा