शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

PM मोदी तीन वेळा पाया पडले; 'त्या' उमेदवाराने केला अवध ओझा यांचा पराभव; जाणून घ्या कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:52 IST

Delhi Election Result : दिल्लीच्या पटपडगंज मतदारसंघातील आपचे उमेदवार अवध ओझा यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

Delhi Election Result : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. भाजपला बहुमत मिळत आहे. २७ वर्षानंतर भाजप दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ४५, आप २५ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे आपचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत. भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांना ३१८६ मतांनी पराभूत केले आहे. 

दुसरीकडे, दिल्लीच्या पटपडगंज मतदारसंघातील आपचे उमेदवार अवध ओझा यांनी आपला पराभव मान्य केला आहे. निवडणुकीत अवध ओझा यांचा भाजपच्या रवींद्र सिंह नेगी यांनी पराभव केला आहे. गेल्या निवडणुकीत पटपडगंज मतदारसंघात रवींद्र सिंह नेगी यांनी मनीष सिसोदिया यांना कडवी टक्कर दिली होती. तेव्हा कमी मतांच्या फरकाने मनीष सिसोदिया निवडणूक जिंकू शकले होते. यंदाच्या निवडणुकीत मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज ऐवजी जंगपुरा येथून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना जंगपुरा येथे पराभव पत्करावा लागला. 

भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, मतमोजणीच्या १३ पैकी १० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये भाजप उमेदवार रवींद्र सिंह नेगी २२ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. रवींद्र सिंह नेगी यांना एकूण ५८,८२१ मते मिळाली, तर आपचे उमेदवार अवध ओझा यांना ३६,५७८ मते मिळाली. काँग्रेसचे अनिल चौधरी तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना १२१७६ मते मिळाली आहेत. दरम्यान, आपचे उमेदवार अवध ओझा यांनी आपला पराभव मान्य केला आहे.   

अवध ओझा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "मी जनतेचे आभार मानतो. मी दुसरा स्थानकावर आलो. पुढच्या वेळी स्वतः अव्वल स्थानावर येण्याचा प्रयत्न करेन. मी सर्वांना भेटू शकलो नाही, ही माझी चूक होती. कदाचित मला यासाठी योग्य वेळ मिळाला नसेल, पण तरीही मी या पराभवाची वैयक्तिक जबाबदारी घेतो." आप २०१३ पासून पटपडगंज मतदारसंघातून सातत्याने निवडणूक जिंकत होती आणि मनीष सिसोदिया येथून आमदार म्हणून निवडून आले होते.

रवींद्र सिंह नेगी कोण आहेत?दरम्यान, पटपडगंजमधील 'आप'चा किल्ला उद्ध्वस्त करणारे रवींद्र सिंह नेगी कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घ्या... रवींद्र सिंह नेगी हे विनोद नगर येथील भाजप नगरसेवक आहेत. विनोद नगर वॉर्ड हा पटपडगंज विधानसभा मतदारसंघात येतो. रवींद्र सिंह नेगी हे पटपडगंज परिसरातील एक प्रसिद्ध नाव आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र सिंह नेगी यांनी मनीष सिसोदिया यांना कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत होते. रवींद्र सिंह नेगी हे मूळचे उत्तराखंडचे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वेळा पाया पडले!पटपडगंज जागेवर विजय मिळवणारे भाजपचे रवींद्र सिंह नेगी हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क तीन वेळा खाली वाकून पाया पडले होते. दरम्यान, प्रचार रॅलीनंतर उमेदवार रवींद्र सिंह नेगी यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श केले. त्यानंतर नरेंद्र मोदींनीही तीन वेळा त्यांच्या पाया पडले. हे पाहून मंचावर उपस्थित सारेच आश्चर्यचकित झाले. तसेच,  यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाManish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली