शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'...मग काँग्रेसनं आपलं दुकान बंद करायचं का?'; दिल्लीतील 'भोपळ्या'वरून नेत्यांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:18 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसमध्ये अफरातफर माजली आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसमध्ये अफरातफर माजली आहे. काँग्रेसच्या पार्टीच्या 63 उमेदवारांचं या निवडणुकीत डिपॉझिटही जप्त झालं. या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अरविंद केजरीवालांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली निवडणूक प्रभारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीसी चाको यांनी आपच्या उदयानंतर काँग्रेसला आपले मतदार परत मिळवता आलेले नसल्याचं म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपच्या विजयानंतर काँग्रेसला झालेल्या आनंदावर निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम यांच्या ट्विटला रिट्विट करत शर्मिष्ठा म्हणाल्या, काँग्रेसनं आपलं दुकान बंद करून टाकलं पाहिजे काय?. त्यामुळे काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झालेली आहे. शर्मिष्ठा पी. चिदंबरम यांचं ट्विट रिट्विट करत म्हणाल्या, सर, काँग्रेस पक्ष भाजपाला हरवण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षांचं आऊटसोर्सिंग करत आहेत का?, जर तसं करत नसल्यास पराभवाचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपच्या विजयाचा आनंद साजरा का करत आहे? आणि जर असंच सुरू राहणार असल्यास आपण आपलं दुकान बंद केलं पाहिजे. शर्मिष्ठा मुखर्जींनी पी. चिदंबरम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ''आत्मपरीक्षण खूप झालं, आता कारवाई करा''तत्पूर्वी मंगळवारी शर्मिष्ठा यांनी काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले होते. भाजपा ध्रुवीकरणाचं, तर केजरीवाल स्मार्ट राजकारण करत आहेत. मग आपण काय करत आहोत?, काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळाली नसल्यानं शर्मिष्ठा नाराज झाल्या आहेत. आपण दिल्लीत पुन्हा एकदा हरलो आहोत. आत्मपरीक्षण खूप झालं, आता कारवाई झाली पाहिजे. उच्च स्तरावरून निर्णय घेण्यास होणारा विलंब, रणनीतीचा अभाव आणि राज्यस्तरावर एकजूट नसणे, कार्यकर्त्यांचा निरुत्साह, तळागाळातील संवादाचा अभाव ही पराभवाची कारणे आहेत. मी माझी जबाबदारी स्वीकारते, असंही शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी