शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

Delhi Election Results : जय बजरंगबली! दिल्ली जिंकली आणि केजरीवालांनी मारुतीरायाच्या चरणी धाव घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:59 IST

भाजपाच्या ध्रुविकरणाच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी केजरीवाल मारुतीरायाला शरण गेले होते.

ठळक मुद्देप्रचारादरम्यान केजरीवाल यांनी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील मारुतीचे दर्शन घेतले होते अनेक वृत्तवाहिन्यांवर ते हनुमान चालिसा वाचतानाही दिसून आले होतेकेजरीवाल यांनी घेतलेल्या बजरंगबलीच्या दर्शनाचा मतदारांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला होता

नवी दिल्ली - आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने बंपर विजय मिळवला. आपच्या या विजयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांसोबत इतर अनेक घटकांनीही निर्णायक भूमिका बजावली होती. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी दर्शन घेतलेल्या दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमंताचा आशीर्वादही त्यांच्या विजयात निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निकालानंतर दिल्लीकर मतदारांचे आभार मानून झाल्यानंतर केजरीवाल यांनी त्यांच्यासाठी संकटमोचक ठरलेल्या बजरंगबली हनुमानाचरणी धाव घेतली. 

या निवडणुकीत प्रचाराच्या निर्णायक टप्प्यावर केजरीवाल यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्या दर्शनाचा मतदारांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला होता.  त्यामुळे आज निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे सपत्निक कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराला भेट दिली आणि मारुतीरायांचे दर्शन घेतले. यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सुद्धा उपस्थित होते.   दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुविकरणाचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला. तसेच आम आदमी पक्ष हा मुस्लिम धार्जिणा असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत होता. आपल्या विरोधी पक्षाला मुस्लिम धार्जिणे ठरवून ध्रुविकरण घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून याआधी अनेकदा झाला. तसेच त्यात त्यांना यशही मिळाले होते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने हे अस्त्र काँग्रेसवर चालवून काँग्रेसचा दारुण पराभव घडवून आणला होता.  दरम्यान, दिल्लीतही भाजपाने हीच रणनीती आखली होती. भाजपाच्या या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी केजरीवाल मारुतीरायाला शरण गेले होते. तसेच मारुतीरायाची भक्ती करणाऱ्याच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन, असे प्रभू श्रीरामांनी सांगितल्याचे केजरीवाल म्हणाले होते. तसेच अनेक वृत्तवाहिन्यांवर ते हनुमान चालिसा वाचतानाही दिसून आले होते.  या सर्वांचा मतदारांवर सकारात्मक परिणाम झाला.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीPoliticsराजकारणBJPभाजपा