शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results: लग्नाच्या मागण्यांनंतर मतांचा पाऊस; आपचा 'मोस्ट सुटेबल बॅचलर' विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:21 IST

राजेंद्र नगर मतदारसंघात राघव चढ्ढा यांचा दणदणीत विजय

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीनं ६० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत पुन्हा एकदा दणदणीत विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या आप ६३ जागांवर आघाडीवर असून भाजपा ७ मतदारसंघांत पुढे आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये ६० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा करिश्मा आपनं करुन दाखवला आहे. आपचे राघव चढ्ढा यांनी राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून जवळपास २० हजार मतांनी विजय मिळवला आहे. ३१ वर्षांच्या चढ्ढा यांच्यासमोर भाजपाच्या आर. पी. सिंह यांचं आव्हान होतं. मात्र सुरुवातीपासून चढ्ढा यांनी आघाडी घेतली. अखेरपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवत दणदणीत विजय संपादन केला. राघव चढ्ढा यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर सिंह २०१३, २०१५ मध्येही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. 

पेशानं चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या राघव चढ्ढा यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. दक्षिण दिल्लीमधून त्यांना भाजपाच्या रमेश बिधुरी यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ते पराभूत झाले. विद्यमान आमदार विजेंदर गर्ग यांचं तिकीट कापून यंदा आपनं त्यांना संधी दिली. 'राजेंद्र नगर का बेटा' असं म्हणत त्यांनी प्रचार केला होता. यंदाच्या निवडणुकीत राघव चढ्ढा आपचे स्टार प्रचारक होते. चढ्ढा यांची टीम सोशल मीडियावर अतिशय सक्रीय आहेत. चढ्ढा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना त्यांना लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले. एका महिलेनं त्यांना थेट ट्विटरवर टॅग करत लग्नाची मागणी घातली. हा प्रस्ताव चढ्ढा यांनी अतिशय कौशल्यानं हाताळला. 'सध्या देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत नसल्यानं ही वेळ लग्नासाठी योग्य नाही,' असं कारण देत चढ्ढा यांनी संबंधित महिलेसोबत लग्न करण्यास विनम्र नकार दिला.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपा