शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

Delhi Election Result: दिल्लीतील दारुण पराभवानंतर भाजपाध्यक्षांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:02 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठी प्रचारयंत्रणा कामाला लावूनही भाजपाला दोन आकडी जागा जिंकता आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देमतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतोआम्ही दिल्लीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावूअरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत प्रचंड शक्ती पणाला लावूनही भाजपाला दोन आकडी जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्लीतील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करत असून, राज्यात भाजपा जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असे नड्डा यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार आम आदमी पक्षाने ६३ जागांवर कब्जा केला असून, भाजपाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रिय नेतृत्वासमोर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने अवलंबलेली रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना नड्डा म्हणाले की, ''आम्ही आपला पराभव मान्य करतो. मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. आम्ही दिल्लीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू. दिल्लीच्या विकासासंबंधीचे मुद्दे आम्ही वेळोवेळी उपस्थित करू. तसेच आम आदमी पक्ष दिल्लीतील जनतेचा विकास करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयासाठी अरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.'' 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठी प्रचारयंत्रणा उतरवली होती. भाजपाचे केंद्र आणि विविध राज्यातील दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. मात्र एवढ्या मेहनतीनंतरही आपला रोखणे भाजपाला शक्य झाले नाही. भाजपाने प्रचारात उपस्थित केलेल्या भावनिक मुद्द्यांपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी केलेला विकासाभिमुख प्रचार मतदारांना भावला. परिणामी भाजपाचा दारुण पराभव झाला.

 

टॅग्स :BJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूकPoliticsराजकारण