शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दिल्लीत केजरीवाल यांच्या बंपर विजयात ही पंचसूत्री ठरली निर्णायक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 21:29 IST

दिल्ली विधानसभेतील ७० जागांपैकी ६२ जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपाला केवळ ८ जागांवर विजय मिळाला आहे.

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. दिल्ली विधानसभेतील ७० जागांपैकी ६२ जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपाला केवळ ८ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, आपच्या आजच्या विजयात पाच घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  दिल्लीच्या विकासावर लक्ष केंद्रित करून प्रचार दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच अरविंद केजरीवाल यांनी सकारात्मक प्रचारावर भर दिला. त्यांनी पाच वर्षांत केलेला दिल्लीचा विकास हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. त्याचा फायदा आपला झाला. मोफत वीज आणि पाणी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीकरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि २० हजार लीटरपर्यंत मोफत पाणी पुरवण्याची घोषणा केली होती. त्याचा लाभ गरीब वर्गाला मोठ्या प्रमाणावर झाला. आता निवडणुकीत आपने या कामाच्या बदल्यात मते मागितली आणि आपच्या झोळीत मतांचे भरभरून दान पडले.

आरोग्य आणि शिक्षण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील आरोग्य सुविधा आणि शिक्षणावर भर दिला. त्यांनी अर्थसंकल्पामधून शिक्षण आणि आरोग्यासाठी भरीव तरतूद केली. त्याचे परिणाम म्हणून दिल्लीतील आरोग्य आणि शिक्षणव्यस्था सुधरली आहे. त्याचाही आपला लाभ झाला. 

महिलांना मेट्रो आणि बसमधून मोफत प्रवास दिल्लीतील महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रो आणि सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. याचा दिल्लीतील महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. त्याचेही प्रतिबिंब आजच्या निकालात उमटले. ऑड इव्हन आणि प्रदूषण नियंत्रण दिल्लीतील प्रदूषणाची समस्या गंभीर असली तरी येथील प्रदूषण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने केजरीवाल यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीत वाहनांसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युलाही आणला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआप