शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

प्रवेश वर्मांच्या मार्गात अडथळा! निकालानंतर 'या' भाजप आमदाराने केला मुख्यमंत्रीपदाचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:23 IST

Delhi Election Result : आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. 

Delhi Election Result : नवी दिल्ली : तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भाजपानेदिल्लीतआपला विजय नोंदवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता दिल्लीत मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये अनेक मोठे चेहरे आहेत. आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. 

अशातच पाच वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह बिष्ट यांनी अप्रत्यक्षपणे स्वत: मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर मोहन सिंग बिष्ट म्हणाले, "मी सहा वेळा जिंकलो आहे, माझी प्रोफाईल मुख्यमंत्री होण्याइतकी आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद हे वरच्या स्तरावर ठरवले जाईल, परंतू किमान मी प्रोटेम स्पीकर तरी होईन. मीच आमदारांना शपथ देईन."

दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश साहिब सिंह वर्मा, मनोज तिवारी आणि वीरेंद्र सचदेवा यांसारखे चेहरांचा समावेश आहे. प्रवेश साहिब सिंह वर्मा यांचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून विजय मिळवला होता.

मोहन सिंह बिष्ट कोण आहेत?मोहन सिंह बिष्ट हे करावल नगरमधून पाच वेळा आमदार राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने मोहन सिंग बिष्ट यांना करावल नगरऐवजी मुस्तफाबादमधून उमेदवारी दिली. यावर मोहन सिंग बिष्ट यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, नंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने करावल नगरमधून कपिल मिश्रा यांना तिकीट दिले. मोहन सिंग बिष्ट यांना २०१५ मध्येच पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा कपिल मिश्रा यांनी आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि मोहन सिंग बिष्ट यांचा पराभव केला होता. नंतर कपिल मिश्रा हे भाजपमध्ये सामील झाले.

प्रवेश वर्मा यांनी घेतली अमित शाह यांची भेट!प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश साहिब सिंह वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली