शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 10:11 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देआपने केजरीवालांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. रोड शोमधील प्रचंड गर्दीमुळे केजरीवाल उमेदवारी अर्ज भरायला पोहचू शकले नाहीत. केजरीवाल यांना मंगळवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उशीर झाल्याने सोमवारी (20 जानेवारी ) नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. आपने केजरीवालांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. सोमवारी रोड शोला सुरुवात झाली. आपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच घोषणाही सुरू होत्या. मात्र प्रचंड गर्दीमुळे केजरीवाल उमेदवारी अर्ज भरायला पोहचू शकले नाहीत. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 3 पर्यंतची वेळ होती. परंतु मुख्यमंत्री केजरीवाल जिल्हाधिकारी कार्यालयात उशिरा पोहोचल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे आता केजरीवाल यांना मंगळवारी (21 जानेवारी) अर्ज दाखल करावा लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने उशीर झाला. कार्यकर्त्यांना सोडून उमेदवारी अर्ज दाखल करणे योग्य नव्हते. यामुळे उमेदवारी अर्ज सोमवारी भरता आला नसल्याचं म्हटलं आहे. 

केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपच्या नेत्या आतिशी आणि इतरही अनेक नेते, कार्यकर्ते रोड शोमध्ये मोठ्या संख्येने सामील झाले होते. केजरीवाल यांचे कुटुंबीय ही रोड शोमध्ये सहभागी झाले होते. 'अच्छे बिते पाच साल, लगे रहो केजरीवाल' या घोषणा रोड शो दरम्यान देण्यात येत होत्या. आपने एकाचवेळी 70 उमेदवार जाहीर केले होते. मात्र, भाजपाला मित्रपक्षांमुळे सर्व यादी जाहीर करता आली नव्हती. शिरोमणी अकाली दलाने सीएएवरून आवाज उठविता येत नसल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत भाजपाची साथ सोडली आहे. तर भाजपाला नितिशकुमार यांचा संजद आणि लोक जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला असून हे दोन पक्ष तीन जागा लढविणार आहेत.

भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवार देण्यात आला नव्हता. सोमवारी रात्री उशिराने भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने उर्वरित 10 जागांवर तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, नवी दिल्लीहून सुनील यादव, शाहदराहून संजय गोयल, कृष्णानगरहून अनिल गोयल, महरौलीहून कुसुम खत्री, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रविंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दिल्लीमध्ये युतीमुळे दोन जागा जदयूला देण्यात आल्या आहेत. यामध्ये संगम बिहार आणि बुराडी या जागा आहेत. तर एक जागा लोजपाला देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप

आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग

सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग

Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली

शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद

अभिमानस्पद! ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या लेकींचा रोबोट जाणार अमेरिकेला

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा