शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्या १३ जागांवर काँग्रेसने मतविभाजन घडवलं नसतं तरी झाला असता आपचा पराभव, समोर आलं असं गणित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:05 IST

Delhi Election 2025 Result: दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजपाचा पराभव झाला असता असा दावा काही जणांकडून केला जात आहे. मात्र हे समीकरण वरकरणी जितकं साधं सोपं दिसतं तेवढं नाही आहे, हे सविस्तर आकडेवारीवरून दिसून येत आहे.

शनिवारी लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला पराभव पत्करावा लागला. तर भाजपाने ७० पैकी ४८ जिंकून स्पष्ट बहुमतासह तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीची सत्ता मिळवली आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मतविभाजन घडवल्याने अनेक जागांवर आम आदमी पक्षाचा पराभव झाल्याचा दावा आकडेवारीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दिल्लीतील ७० पैकी १३ जागांवर आपच्या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा अधिक मतं काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली आहेत. त्यावरून आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजपाचा पराभव झाला असता असा दावा काही जणांकडून केला जात आहे. मात्र हे समीकरण वरकरणी जितकं साधं सोपं दिसतं तेवढं नाही आहे, हे सविस्तर आकडेवारीवरून दिसून येत आहे.

दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असती तरी आपच्या कार्यकर्त्यांनी सर्वच्या सर्व मतं काँग्रेसला दिली असती किंवा काँग्रेसची सर्वच्या सर्व मतं आपला मिळाली असती, असं छातीठोकपणे सांगता येत नाही.  २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि २०२५ मधील दिल्ली विधानसभा निवडणूक याच्या आकडेवारीच्या विश्लेषणामधून काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. २०२२ मध्ये झालेल्या दिल्ली एमसीडी निवडणुकीत दिल्लीतील विधानसभेच्या ७० पैकी ६८ जागांवर आम आदमी पक्षाला ४२.०५ टक्के मतं मिळाली होती. विधानसभेच्या उर्वरित २ जागा ह्या नवी दिल्ली महापालिकेच्या अखत्यारीत येतात, तिथे एमसीडी निवडणूक होत नाही. या आकडेवारीवरून तेव्हापासून आतापर्यंत आपच्या आकडेवारीत फार फरक झाला नसल्याचे दिसून येत आहे.

त्यानंतर २०२४ मध्ये दिल्लीमधील लोकसभा निवडणुकीवेळी दिल्लीतील ७ जागांपैकी ४ जागांवर आप तर ३ जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली होती.  त्यावेळीही दोन्ही पक्षांना मिळून ४२.५३ टक्के मतं मिळाली होती. मात्र या विधानसभेतील दोन्ही पक्षांची एकत्रित आकडेवारी पाहिल्यास ती ४९.९ टक्के एवढी होते. दरम्यान, दिल्लीतील ७० पैकी ४२ जागा अशा आहेत. जिथे आम आदमी पक्षाला मिळालेली मतं ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकी आप आणि काँग्रेसच्या आघाडीला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की, आपच्या कार्यकर्त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी जिथे कांग्रेसचे उमेदवार आहेत अशा ठिकाणी काँग्रेसला मतदान केलं नाही.

मात्र आता काँग्रेससोबत आघाडी नसताना या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाला सक्रियपणे मतजान केलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आप आणि काँग्रेसची मतं एकत्र जोडून दिल्ली विधानसभा निवडणुकीतील जय पराजयाबाबत अंदाज बांधला जाऊ शकत नाही. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपची आघाडी असतील तर आपच्या कार्यकर्त्यांना आपलाच मतदान केलं असतं असं नाही. तर त्यापैकी काही मतदार हा भाजपाच्या दिशेनेही वळला असता. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा