केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी काँग्रेस पक्षासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. तसेच, पुढील २५ वर्षे काँग्रेससाठी पुन्हा सत्तेत येणे अवघड असेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत ते म्हणाले, राहुल गांधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. राहुल गांधी अजूनही म्हणत आहेत की, 'संविधान खतरे में है', पण संविधान धोक्यात नाही.
आठवले म्हणाले, "संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. मात्र, संविधानाने नवे कायदे तयार करण्याचा अधिकार दिला आहे. संसदेला जुन्या कायद्यांमध्ये संशोधन करण्याचा अधिकार आहे. यामुळे संविधानाला कसलाही धोका नाही आणि राहुल गांधी अशा प्रकारची विधाने करून आपल्याच पक्षाचे नुकसान करत आहेत.
राहुल गांधींवर निशाना -केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान मजबूत करत आहेत. तर राहुल गांधी आणि इतर लोक संविधानासंदर्भात राजकीय अपप्रचार करत आहेत. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकण्यासंदर्भात आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले, "राहुल गांधींना माझा प्रश्न आहे की, आपले सरकार इतकी वर्षें सत्तेत असताना आपण ही मर्यादा का नाही वाढवली? आपले सरकार तर २०१४ पर्यंत सत्तेत होते. आपण ते वाढवले नाही. तोपर्यंत आपण इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) सक्षम केले नाही?’’