शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारादरम्यान महिलेला दिला फ्लाईंग किस, आपच्या आमदाराविरोधात एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 07:51 IST

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र तत्पूर्वी आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार अडचणीत सापडले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्यांविरोधात महिलेची छेड काढल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र तत्पूर्वी आम आदमी पक्षाचे आणखी एक आमदार अडचणीत सापडले आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्यांविरोधात महिलेची छेड काढल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आली आहे. दिनेश मोहनिया यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका महिलेला फ्लाईंग किस दिला होता. याप्रकरणी व्हिडिओ चित्रिकरणाच्या  आधारावर आणि महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी  मोहनिया यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र याबाबत दिनेश मोहनिया यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

दिल्लीमधील संगम विहार मतदारसंघातून दिनेश मोहनिया हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून दिनेश मोहनिया यांनी सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. तसेच पक्षाने त्यांना चौथ्यांदा इथून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपाचे चंदन कुमार चौधरी आणि काँग्रेसचे हर्ष चौधरी यांचं आव्हान आहे. मात्र मतदानापूर्वीच दिनेश मोहनिया यांच्यावर एका महिलेची छेड काढल्याचा आरोप झाला आहे.

दिनेश मोहनिया हे याआधीही महिलांच्या एका गटासोबत गैरवर्तन केल्याने वादात सापडले होते. २३ जून २०१६ रोजी महिलांच्या एका समुहासोबच कथितपणे गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. आपल्या परिसरातील पाण्याच्या समस्येबाबत तक्रार घेऊन आलेल्या महिलांसोबत दिनेश मोहनिया यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाईही झाली होती. मात्र पुढे २०२० मध्ये दिनेश मोहनिया यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आलं होतं.   

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAam Admi partyआम आदमी पार्टीCrime Newsगुन्हेगारी