शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर जोरदार जुंपली, दिल्ली विधानसभा निवडणुकीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 04:35 IST

भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस सोशल मीडियावर एकामेकांविरुद्ध जोरदार प्रचार करीत आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : जसजशी दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतशा सोशल मीडियासह इंटरनेटवर निवडणूक प्रचाराचा जोर वाढत आहे. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस सोशल मीडियावर एकामेकांविरुद्ध जोरदार प्रचार करीत आहेत.भाजपच्या सोशल मीडिया समितीच्या एका सदस्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्लीतील प्रत्येक मतदान केंद्रावर पाच आणि विभाग स्तरावर तीन लोकांचे पथक आहे. याशिवाय राज्यपातळीवर ८ आणि लोकसभा मतदारसंघात एक-एक सदस्यांकडे सोशल मीडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व सोशल मीडियासाठीचा मजूकर तयार करणे आणि तो प्रसारित करण्याचे काम करतात. मोदी सरकारने दिल्लीसाठी केलेल्या कामाला विशेष महत्त्व दिले जात आहे, तसेच केजरीवाल सरकारच्या अपूर्ण आश्वासनांवर भर दिला जात आहे. सर्जनशील पथक व्हिडिओ, ग्राफिक्स आणि इतर टिंगल-टवाळी करणाऱ्या चित्रकृती तयार करतात.दररोज लाखो रुपयांचा खर्चडिजिटल जाहिरांतीवर राजकीय पक्ष दररोेज लाखो रुपये खर्च करीत आहेत. यात आम आदमी पार्टी सर्वांत आघाडीवर आहे. फेसबुकवर गेल्या सात दिवसांत आम आदमी पार्टीने १३ लाखा रुपयांच्या जाहिराती दिल्या. यापैकी सात लाख रुपये मागच्या सोमवारी खर्च करण्यात आले. भाजपने फेसबुकवर १ लाख ७६ हजार रुपयांच्या जाहिराती दिल्या. यापैकी ३१ हजार रुपये एका दिवसांत खर्च करण्यात आले.सोशल मीडियात ‘डर्टी पिक्चर’राजकीय पक्षांच्या जाहिरातीशिवाय नेत्यांकडूनही व्यक्तिश: किंवा अप्रत्यक्षपणे जाहिरातींवर खर्च केला जातो. अनेकदा पक्षाच्या प्रचारासाठी एखादा समर्थक किंवा कार्यकर्त्यामार्फत खर्च केला जातो. असे सर्वच पक्ष करतात. एखाद्या विचारधारेचे अनेक लोक समर्थक आहेत, असेही भासविले जाते. तथापि, हा केवळ भ्रम असतो; परंतु लोक प्रभावित होतात.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकSocial Mediaसोशल मीडिया