शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Delhi Election 2020 : केजरीवालांच्या कन्येनं विरोधकांना विचारला जाब, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 11:34 IST

प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख भाजपाच्या नेत्यांकडून दहशतवादी असा करण्यात.

नवी दिल्ली : जसजशी दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतशा सोशल मीडियासह विविध सभांमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर वाढत आहे. भाजपा, आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस एकामेकांविरुद्ध जोरदार प्रचार करीत आहेत.

दिल्लीतील मतदारांचा कल जाणून घेतला असता दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचाच बोलबाला असल्याचे दिसून आले आहे. मात्र, प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख भाजपाच्या नेत्यांकडून दहशतवादी असा करण्यात आला आहे. याला प्रतिउत्तर देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल राजकीय मैदानात उतरली आहे. 

एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 'राजकारण चुकीचे आहे. मात्र, याचा स्तर खाली जात आहे. जर लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळवून देत असेल तर तो दहशतवाद आहे का? असा सवाल करत हर्षिताने आपल्या वडिलांना दहशतवादी म्हटल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. याचबरोबर, जर मुलांना चांगले शिक्षण पुरविले जात असेल तर तो दहशतवाद का? जर वीज आणि पाण्याची सोयी सुविधा वेळेत पुरविली जात असेल तर तो दहशतवाद  का? असेही सवाल हर्षिताने उपस्थित केले आहेत. 

याशिवाय, माझे वडील सामाजिक काम करीत आले आहेत. माझ्या आठवणीत आहे की, माझे वडील दररोज सकाळी 6 वाजता उठवून आमच्या कुटुंबाला भगवत गीताचे पाठ वाचवून दाखवित. तसेच, आम्ही 'इंसान का इंसान से हो भाईचारा' हे गाणे सुद्धा म्हणायचो. हा दहशतवाद कसा असेल? असे हर्षिताने म्हटले आहे. 

दरम्यान, दिल्लीची सत्ता पुन्हा राखण्यासाठी कंबर कसलेल्या आपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यामधून आपने पुढील पाच वर्षांसाठीचा कार्यक्रम जनतेसमोर मांडला आहे. यामध्ये दिल्लीत जनलोकपाल आणि स्वराज बिल लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबरोबरच शाळेत देशभक्तीपर अभ्यासक्रमही लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. 

आपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने- दिल्लीतील प्रत्येक मुलाला शालेय शिक्षणाची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला निरोगी आरोग्याची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी शुद्ध पाण्याची हमी - प्रत्येक घरापर्यंत 24 तास पिण्याचे पाणी पोहोचवण्याची हमी - प्रत्येक ग्राहकाला 24 तास आणि 200 यूनिटपर्यंत मोफत विजेची हमी- प्रदूषणाची पातळी कमी करण्याची हमी - यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणार  - महिला सुरक्षेसाठी दिल्लीमध्ये सीसीटीव्ही, स्ट्रीट लाइट आणि महिला मार्शलची नियुक्ती करणार - कच्च्या वस्त्यांचे पक्के बांधकाम करण्याची हमी 

 

महत्त्वाच्या बातम्या 

निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप

औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप