शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ५० लाख रुपयांचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:23 IST

Delhi Crime: दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना.

Delhi Crime: राजधानी दिल्लीतील गजबजलेल्या चांदणी चौक परिसरात बुधवारी(दि.२५) दिवसाढवळ्या झालेल्या लूटमारीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किनारी बाजारातील गली अनारवाली येथे असलेल्या एका ज्वेलरी दुकानात दरोडेखोरांनी थेट बंदुकीच्या धाकाने लूट केली. या लुटीत सुमारे ५० लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘रिया गोल्ड’ ज्वेलर्सवर दरोडा 

मिळालेल्या माहितीनुसार, गली अनारवाली परिसरात ‘रिया गोल्ड’ नावाचे ज्वेलरी दुकान आहे. बुधवारी दुपारी दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असतानाच दरोडेखोर ग्राहक बनून दुकानात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी कर्मचार्‍यांशी थोडी चर्चा केली आणि अचानक बंदुका काढून सर्वांना गन पॉइंटवर घेतले.

काही क्षणातच परिस्थिती गंभीर बनली. दरोडेखोरांनी कर्मचार्‍यांना धमकावत, जे काही दागिने आहेत ते सगळे बाहेर काढा, असे सांगितले. जीवाच्या भीतीपोटी कर्मचार्‍यांनी दुकानातील दागिने त्यांच्या हवाली केले. त्यानंतर दरोडेखोर सुमारे 50 लाखांचे दागिने घेऊन पसार झाले.

पोलिसांची तत्काळ कारवाई

दरोडेखोर निघून गेल्यानंतर घाबरलेले कर्मचारी दुकानाबाहेर आले आणि तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच चांदणी चौक पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरू केला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.

गजबजलेल्या बाजारात लूट, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

दिवसाढवळ्या आणि अत्यंत गजबजलेल्या बाजारपेठेत झालेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चांदणी चौकसारख्या ठिकाणी दिवसभर प्रचंड गर्दी असते, तरीही बदमाशांनी इतक्या धाडसाने लूट केल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके

पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींची ओळख पटवण्यासाठी, पळून जाण्याचे मार्ग शोधण्यासाठी आणि लुटलेले दागिने हस्तगत करण्यासाठी विशेष तपास पथके तैनात करण्यात आली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Daylight robbery at Delhi jewelry store; ₹5 million looted.

Web Summary : Delhi's Chandni Chowk saw a daring daylight robbery at 'Ria Gold' jewelry store. Armed robbers looted ₹5 million worth of jewelry. Police are investigating, raising security concerns among local businesses.
टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी