शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? अरविंद केजरीवालांना पेन्शन किती मिळेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:37 IST

आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? याबाबत चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत नुकतेच भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह ६ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर दिल्लीचे नवे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.  आजपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. 

आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? याबाबत चर्चा सुरू आहे. तर, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दरमहा १.७० लाख रुपये वेतन मिळेल. दरम्यान, हे वेतन मार्च २०२३ च्या आदेशानुसार निश्चित करण्यात आले आहे. ज्यामध्ये मूळ वेतन ६०,००० रुपये आहे. याशिवाय, त्यांना इतर भत्तेही मिळतील.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोणते भत्ते मिळतील?६०,००० रुपयांच्या मूळ वेतनाव्यतिरिक्त दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ३०,००० रुपये विधानसभा भत्ता, २५,००० रुपये सचिवीय सहाय्य, १०,००० रुपये टेलिफोन भत्ता, १०,००० रुपये प्रवास भत्ता आणि १,५०० रुपये दैनिक भत्ता मिळतो.

मुख्यमंत्र्यांना 'या' सुविधा मिळतील - वेतनासोबतच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना गाडी आणि बंगल्यासह अनेक सुविधा मिळतील.- मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हेलिकॉप्टर, सरकारी गाडी आणि अधिकृत वाहनासाठी दरमहा ७०० लिटर मोफत पेट्रोल मिळेल.- जर मुख्यमंत्री त्यांची खाजगी गाडी वापरत असतील तर त्यांना दरमहा १०,००० रुपये मिळतील.- तसेच, मुख्यमंत्र्यांना एक सरकारी निवासस्थान देखील मिळते, ज्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत.- याशिवाय, दरमहा ५,००० युनिट वीज मोफत मिळेल.- मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळात १२ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

अरविंद केजरीवाल यांना किती मिळेल पेन्शन?आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना किती रुपयांची पेन्शन मिळू शकते. याबद्दलही सध्या चर्चा सुरु आहे. तर अरविंद केजरीवाल यांना माजी आमदारांप्रमाणे १५,००० रुपये पेन्शन मिळेल. जर एखादा आमदार एकापेक्षा जास्त वेळा जिंकला तर ही रक्कम १,००० रुपयांनी वाढते, अशीही तरतूद आहे. 

दरम्यान, अरविंद केजरीवाल हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते माजी मुख्यमंत्री म्हणून सरकारी निवासस्थानाची विनंती करू शकतात. तसेच, माजी मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांना सरकारी निवासस्थान, सरकारी गाडी आणि ड्रायव्हर मिळू शकतो. याशिवाय, त्यांना टेलिफोन, इंटरनेट, प्रवास भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा देखील मिळतील.

टॅग्स :delhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल