शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:02 IST

Delhi Politics: दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? सध्या या प्रश्नावर सस्पेन्स कायम आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? सध्या या प्रश्नावर सस्पेन्स कायम आहे. एकीकडे राजकीय वर्तुळात 'आप'च्या जवळपास पाच बड्या नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे नव्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी कोण-कोण निर्णय घेणार हेही समोर आले आहे.

सूत्रांनी सोमवारी (दि.१६ ) 'एबीपी न्यूज'ला माहिती दिली की, 'आप'च्या पॉलिटिकल अफेयर्स कमेटीची (पीएसी) बैठक संध्याकाळी सिव्हिल लाइन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत जे नाव निश्चित केले जाईल ते एक दिवसानंतर म्हणजे मंगळवारी (दि.१७) आपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठेवण्यात येईल आणि त्यानंतर नाव घोषित केलं जाईल.

आपच्या PAC सदस्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत, जे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीची भूमिका बजावतील.....- अरविंद केजरीवाल - भगवंत मान- मनीष सिसोदिया- संजय सिंह- संदीप पाठक- गोपाल राय- आतिशी - एनडी गुप्ता- दुर्गेश पाठक- पंकज गुप्ता - राघव चड्ढा- इमरान हुसैन- राखी बिडलान

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' नावं आघाडीवर- आतिशी- सौरभ भारद्वाज- राघव चड्ढा- गोपाल राय- कैलाश गहलोत - सुनीता केजरीवाल

केजरीवालांची राजीनामा देण्याची घोषणादरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. यानंतर काल अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आप आदमी पार्टीच्या (आप) मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रीपद सोडणार आहे. निवडणुकीनंतर मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसेन, माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. यानंतर आता राजकीय वर्तुळात दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी