शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

केजरीवाल सीबीआयच्या रडारवर! रविवारी हजर राहण्याचे समन्स, दिल्लीत पेटणार राजकीय रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 06:14 IST

दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावले

नवी दिल्ली :

दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावले असून येत्या १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता हजर राहावे, असे निर्देश दिले आहेत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स बजावल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. 

नोव्हेंबर २०२१ मध्ये दिल्ली सरकारने नवे मद्य धोरण आखले होते. या धोरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी केल्यानंतर या प्रकरणात  आतापर्यंत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आठ जणांना अटक झाली आहे. परंतु आतापर्यंत केजरीवाल यांचे नाव प्रकरणात आले नव्हते. केजरीवाल मंत्रीमंडळातील सत्येंद्र जैन व मनीष सिसोदिया सध्या कारागृहात आहेत. या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आता थेट मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर अटकेचे वादळ घोंघावू लागल्याने आपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. 

सीबीआयचे समन्स कशासाठी? गेल्या वर्षांमध्ये एखाद्या घोटाळ्यात थेट मुख्यमंत्र्यांना सीबीआयने समन्स पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांचे मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख विजय नायर यांनाही ईडीने अटक केली आहे. ‘विजय नायर यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून त्यांच्याशी आपण संपर्क साधावा’, असे मुख्यमंत्र्यांनी एका आरोपीला दुकानाचा परवाना देण्यासाठी सांगितल्याचे या तपासादरम्यान समोर आल्याने मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स बजावले असल्याचे बोलले जात आहे. सीबीआयला घाबरणारा नाही सीबीआय व ईडीच्या धमक्यांना मी घाबरणारा नाही. मी वेगळ्या मातीचा आहे. या सर्वांचा मी सामना करण्यास तयार आहे. माझे शब्द कदाचित चुकीचे असतील परंतु तुमचे कर्म हे फुटके आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्य समोर येईल : भाजपसीबीआयच्या चौकशीतून सत्य समोर येणार आहे. या सर्व घोटाळयामागे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हात असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात होता. सीबीआयने दिलेल्यासमन्सने हा दावा योग्य होता, हे स्पष्ट झाल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे. 

सिसोदियांनाही रविवारचे समन्स सीबीआय रविवारीच नेत्यांना समन्स बजावित असल्याचे पुन्हा दिसून आले. मनीष सिसोदिया यांनाही सीबीआयने चौकशीसाठी २६ फेब्रुवारी (रविवार) राेजी बोलाविले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनाही रविवारीच (१६ एप्रिल) चौकशीसाठी पाचारण केले आहे.काय आहे मद्य धोरण घोटाळा? - केजरीवाल सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये नवे मद्य धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. - या धोरणात काही त्रुटी असून दारु दुकानांचे परवाने देताना काहींवर मेेेहेरनजर दाखविण्यात आल्याचा अहवाल दिल्ली सरकारचे मुख्यसचिव नरेशकुमार यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला ऑगस्ट २०२२ मध्ये पाठविला. - यानंतर सीबीआयने चौकशीला सुरूवात केली व २१ ठिकाणी छापे मारले. या नव्या मद्य धोरणात करोडो रुपयांची उलाढाल झाली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. मोदी सरकारची दडपशाही अदानीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न विचारल्यामुळे केंद्र सरकारने ही कारवाई केली. गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये झालेली गुंतवणूक कुठून झाली, याचे पुरावे देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणार्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सीबीआय व ईडीचा धाक दाखवून नामोहरम करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. - संजय सिंग, खासदार, आप

विधानसभेत शरसंधान- मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभेत पंतप्रधानांवर हल्ला चढविला होता. - पंतप्रधानांच्या डिग्रीबद्दल त्यांनी थेट प्रश्न विचारला होता. तसेच अदानी प्रकरणावरूनही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल