शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
2
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
3
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
4
चिंताजनक! मेंदू, हृदयावरच नाही तर किडनीवरही होतोय उष्णतेचा वाईट परिणाम; 'असा' करा बचाव
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
6
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
7
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
8
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
9
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
10
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review
11
Post Office: पोस्टात गुंतवणूक करताय? 'या' स्कीममध्ये मिळेल ७९५६४ रुपयांचं फक्त व्याज; पाहा डिटेल्स
12
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
13
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
14
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
15
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
16
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
17
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
18
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
19
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
20
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल घेणार अमित शाह यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 3:20 PM

केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती. 

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दोघांची ही पहिलीच भेट ठरणार आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये होणारी ही एक औपचारिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विधानसभा निवडणुकीत उभय नेत्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार प्रचार केला होती. अनेक टीका करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांची भेट लक्षवेधी ठरणार आहे.

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसून येथील कायदा व्यवस्था देखील केंद्राच्या अखत्यारित आहे.  केजरीवाल यांच्या आधीच्या कार्यकाळात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यात अनेकदा मतभेद झाले होते. मात्र यावेळी केजरीवाल यांनी केंद्राची मदत घेऊन पुढे जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अमित शाह यांनी केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षावर कडाडून टीका केली होती. तसेच शाहीन बागवरून देखील शाह आक्रमक होते. तर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.