दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 03:56 IST2018-10-26T03:56:53+5:302018-10-26T03:56:55+5:30

दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावरील कथित हल्लाप्रकरणी एका स्थानिक न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन दिला आहे.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal has been granted bail | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावरील कथित हल्लाप्रकरणी एका स्थानिक न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन दिला आहे. १९ फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांच्या निवासस्थानी एका बैठकीदरम्यान अंशु प्रकाश यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. आपचे आमदार अमानुल्ला खान आणि प्रकाश जारवाल यांना वगळता सर्व आरोपींना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. न्यायालयात दाखल झाल्यानंतर केजरीवाल आणि सिसोदिया यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Web Title: Delhi Chief Minister Arvind Kejriwal has been granted bail