१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा तपास आता गतीमान झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी या स्फोटात वापरलेल्या कारशी संबंधित एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा बॉम्बस्फोटाच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, हरियाणातील फरीदाबाद येथील एका कार डीलरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या डीलरनेच संशयित डॉ. उमर उन नबी आणि तारिक अहमद मलिक यांना स्फोटात वापरलेली हुंडई आय२० कार विकली होती. सध्या या डीलरची कसून चौकशी सुरू आहे.
अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू
१० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर, अनेकजण जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली असून, त्वरित देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला.
तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल अहमद दार यांना अटक करण्यात आली असून, सध्या डॉ. मुझम्मिलची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा या प्रकरणातील सखोल माहिती आणि इतर संभाव्य नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तातडीने कारवाई करत आहेत.
Web Summary : Delhi blast investigation intensifies; car dealer who sold vehicle to suspects detained in Faridabad. The dealer is being questioned as the investigation continues into the Red Fort bombing. Many innocent people died in the blast.
Web Summary : दिल्ली ब्लास्ट की जांच तेज; संदिग्धों को वाहन बेचने वाला कार डीलर फरीदाबाद में हिरासत में। लाल किले में बमबारी की जांच जारी रहने पर डीलर से पूछताछ की जा रही है। विस्फोट में कई निर्दोष लोग मारे गए।