शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

स्फोटात सामील असलेल्या दोषींचा शोध घ्या, गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:11 IST

Delhi Blast Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सुरक्षा यंत्रणांना दिल्ली स्फोट प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, स्फोटात सामील असलेल्या सर्वांना सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागेल.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सुरक्षा यंत्रणांना दिल्लीस्फोट प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, स्फोटात सामील असलेल्या सर्वांना सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागेल. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आयोजित दोन सुरक्षा आढावा बैठकांचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर शाह यांनी हे निर्देश दिले.

स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवलाकेंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दिल्ली कार स्फोटानंतरच्या स्थितीवर आढावा बैठक घेतली. घटनेमागील प्रत्येक दोषीला पकडण्याचे निर्देश दिले. सूत्रांनी सांगितले की, पहिल्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद वसंत दाते उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीर पोलिस महासंचालक नलीन प्रभात यांचा बैठकीत ऑनलाइन सहभाग होता. गृह मंत्रालयाने स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. सरकारने स्फोटाला दहशतवादी कृत्य मानले आहे, याचे हे संकेत आहेत. 

दोषींना सोडणार नाही: राजनाथ सिंहनवी दिल्ली : देशातील आघाडीच्या तपास संस्था दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची जलद आणि सखोल चौकशी करत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंह म्हणाले, ‘तपासाचे निष्कर्ष लवकरच प्रसिद्ध केले  जातील. मी राष्ट्राला खात्री देऊ इच्छितो की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा केली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना  सोडले जाणार नाही.’ 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Find all culprits involved in blast: Amit Shah orders.

Web Summary : Amit Shah ordered security agencies to find everyone involved in the Delhi blast. NIA will investigate the bombing, treated as a terrorist act. Rajnath Singh assured punishment for those responsible; no one will be spared.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटAmit Shahअमित शाह