Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा तपास सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांनी अनेक ठिकाणी छपा टाकला आहे. या तपासात रोज नवीन खुलासे होत आहेत, दरम्यान, आता संशयित दहशतवादी डॉ. उमर हा बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी मोठ्या हल्ल्याची तयारी करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फरिदाबादमध्ये अटक केलेल्या आठ संशयितांच्या चौकशीदरम्यान हे उघड झाले. ते व्यक्ती काश्मीर, हरयाणा आणि उत्तर प्रदेशशी संबंध असलेल्या एका व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा भाग होते. ते पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. अटक केलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर कट उघड झाला.
१० नोव्हेंबर रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असलेला २८ वर्षीय डॉ. उमर नबी हा लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली i20 कार चालवत होता. या स्फोटात त्याचाही मृत्यू झाला होता. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. उमर हा दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या मॉड्यूलचा एक प्रमुख सदस्य होता.
फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील शिक्षक डॉ. मुझम्मिल अहमद गनई उर्फ मुसैब याला अटक करण्यात आल्यानंतर उमरचा कट उघडकीस आला. डॉ. गनई याच्या खोलीतून ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले. फरीदाबादमध्ये या जप्तीची माहिती उमरला मिळताच तो घाबरला.
तुर्कीला जाऊन आल्यानंतर त्याच्याक बदल झाला
उमर नबीचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला होता, पण काही काळ एकांतवास आणि धार्मिक तीर्थयात्रेनंतर तो पूर्णपणे बदलला होता. २०२१ मध्ये, तो डॉ. गनाई यांच्यासोबत तुर्कीला गेला. या प्रवासादरम्यान, त्यांना जैश-ए-मोहम्मदच्या काही सदस्यांची भेट झाली. परतल्यानंतर, त्याचा कट्टरतावादाकडे कल वाढला होता.
त्याने दहशतवादाचा मार्ग निवडला. दोन्ही डॉक्टरांनी मिळून अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर सारखी स्फोटके गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांनी हे स्फोटके अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात आणि आसपास साठवली. त्यांचा वापर VBIED तयार करण्यासाठी करण्याचा हेतू होता.
डिसेंबरच्या हल्ल्याची तयारी आधीच सुरू होती. उमरने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याच्या काही जवळच्या सहकाऱ्यांना कटाबद्दल सांगितले होते. १० नोव्हेंबर रोजी, त्याने त्याच्या i20 मध्ये स्फोटके ठेवली आणि सर्किट असेंबल करण्यास सुरुवात केली. व्हीबीआयईडी तयार करण्यासाठी त्याने इंटरनेटवरील ट्यूटोरियल वापरले.
दरम्यान, फरिदाबाद पोलिसांनी २,९०० किलोग्रॅम स्फोटके जप्त केल्याची आणि एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याची घोषणा केली. यामुळे उमर पूर्णपणे घाबरला. तो काही तास शहरातील एका मशिदीत लपला. सुमारे तीन तास तिथे राहिल्यानंतर तो त्याच्या कारने निघून गेला. नंतर, लाल किल्ल्याजवळ पोहोचून त्याने स्फोट घडवला.
Web Summary : Delhi blast probe reveals a foiled terror plot. Suspects, linked to Jaish-e-Mohammed, planned a major attack on December 6th. Triggered by explosives seizure, a terrorist detonated a car bomb near Red Fort, killing himself and others.
Web Summary : दिल्ली विस्फोट जांच में एक नाकाम आतंकवादी साजिश का खुलासा हुआ। जैश-ए-मोहम्मद से जुड़े संदिग्धों ने 6 दिसंबर को एक बड़े हमले की योजना बनाई थी। विस्फोटकों की जब्ती से ट्रिगर होकर, एक आतंकवादी ने लाल किले के पास एक कार बम विस्फोट किया, जिसमें वह और अन्य मारे गए।