शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:02 IST

डॉ. शाहीन जैश ए मोहम्मदची जमात उल मोमिनात ही महिला शाखा आहे. त्याची भारतातील जबाबदारी शाहीनवर सोपवली होती

मुंबई - दिल्लीस्फोटानंतर जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची प्रमुख डॉ. शाहीन चर्चेत आली आहे. फरीदाबाद येथून डॉ. शाहीन आणि तिचा भाऊ डॉ. परवेज यांच्याबाबत अनेक खुलासे समोर आलेत. त्यात शाहीन दहशतवादी संघटनेच्या महिला विंगची जबाबदारी सांभाळत होती, त्याशिवाय तिच्यावर जास्तीत जास्त महिलांना संघटनेत सामील करण्याचं काम सोपवले होते. डॉ. शाहीनबाबत विविध माहिती समोर येत आहे. त्यात तिचे लग्न हयात जफर यांच्याशी झालं होते, त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोट झाल्याचं बोलले गेले. आता या प्रकरणी डॉ. हयात जफर यांनी भाष्य केले आहे.

हयात जफर म्हणाले की, आमचे लग्न अँरेज मॅरेज झाले होते. माझ्या लग्नानंतर २०१२ साली शाहीनसोबत तलाक झाला होता. त्यानंतर ती कुठे आहे हे मला माहिती नव्हते. ना मी कधी तिच्याशी संपर्क केला होता. आम्हाला २ मुले होते, दोघेही माझ्यासोबत राहतात. धर्माबद्दल इतकी जागरुकता मी कधी पाहिली नव्हती. ती उदारमतवादी होती. आपण ऑस्ट्रेलिया किंवा युरोपात वास्तव्य करावे असं तिला वाटत होते. त्यावरूनच आमचे वाद झाले. तिने असं का केले, हे तीच सांगू शकते असं त्यांनी म्हटलं. 

डॉ. शाहीन जैश ए मोहम्मदची जमात उल मोमिनात ही महिला शाखा आहे. त्याची भारतातील जबाबदारी शाहीनवर सोपवली होती. मसूद अजहरची बहीण सादिया अजहर पाकिस्तानात जैशच्या महिला विंगची प्रमुख आहे. सादिया अजहरचा पती युसूफ अजहर हा कंधार हायजॅकचा मास्टरमाइंड होता. शाहीन एकूण ३ भाऊ बहीण होते, त्यातील मोठ्या भावाचे नाव शोएब होते. दुसऱ्या नंबरवर  शाहीन तर सर्वात छोटा भाऊ परवेज होता. कानपूरमधील नोकरी गेल्यानंतर शाहीन फरीदाबादला गेली होती. तिचे लग्न महाराष्ट्रात राहणाऱ्या हयात जफर यांच्याशी झाले होते, परंतु त्यांच्यात घटस्फोट झाला आहे. शाहीनने २५ वर्षापूर्वी प्रयागराज येथून मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर लोकसेवा आयोगातून तिची निवड गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापकपदी झाली. त्यानंतर २०१३ साली कुणालाही न सांगता ती अचानक गायब झाली.

दरम्यान, मागील वर्षापासून माझी आणि मुलीची भेट झाली नाही. एक महिन्यापूर्वी आमचे बोलणे झाले होते. माझ्या मुलीबाबत जे काही सांगितले जात आहे, त्यावर माझा विश्वास नाही असं तिचे वडील म्हणाले. तर दर आठवड्याला माझी मुलगा परवेजसोबत बोलणे होते. सोमवारी तो एका लग्नासाठी बाहेर होता, त्यामुळे त्याच्याशी बोलणे झाले नाही. तो मला वारंवार भेटायला येत होता. जर तो आला नाही तरी दर रविवारी त्याच्याशी फोनवर बोलणे व्हायचे असं वडिलांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-husband reveals Jaish commander wasn't devout, cites lifestyle differences.

Web Summary : Jaish-e-Mohammed's Dr. Shaheen's ex-husband, Hayat Zafar, claims she wasn't overtly religious. He revealed their arranged marriage ended in divorce due to disagreements about living abroad. Zafar retains custody of their two children, unaware of her radicalization.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी