शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
3
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
4
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
5
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
6
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
7
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
8
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
9
Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!
10
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
11
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
12
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
13
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
14
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
15
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
16
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
17
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
18
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
19
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
20
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:11 IST

दहशतवादी मॉड्युलच्या सदस्यांनी दहशतवादी हल्ले करण्यासाठी आईडी  कशी बनवायची, हे शिकण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुढे आलेल्या व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलमध्ये सामील झालेल्या डॉक्टरांचे कट्टरपंथीकरण २०१९ मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सुरू झाले, अशी माहिती समोर आली आहे. तपासात सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितले, उच्च शिक्षित व्यावसायिकांना पाकिस्तान व जगाच्या इतर भागांमध्ये असलेल्या दहशतवादी सूत्रधारांकडून दहशतवादी कारवायांसाठी तयार केले जात आहे. तेही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून तयार केले जात आहे.

सूत्रांनी सांगितले की, दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य, ज्यात डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. आदिल राथेर, डॉ. मुझफ्फर राथेर आणि डॉ. उमर-उन-नबी यांचा समावेश आहे. सुरुवातीला सीमेपलीकडून त्यांच्या हँडलर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचे आढळले. या व्यक्तींना ताबडतोब टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये जोडले गेले. जिथे त्यांचे कट्टरपंथीकरण करण्यात आले. त्यानंतर दहशतवादी मॉड्युलच्या सदस्यांनी दहशतवादी हल्ले करण्यासाठी आईडी  कशी बनवायची, हे शिकण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

भारतात कोणताही मुस्लीम  कुलगुरू होऊ शकत नाहीजमियत उलेमा-ए-हिंद (एएम) प्रमुख अर्शद मदानी यांनी दिल्ली बॉम्बस्फोटांशी जोडलेल्या अल-फलाह विद्यापीठाचा उल्लेख करून मुस्लिमांविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. मदानी यांनी दावा केला की जोहरान ममदानी न्यू यॉर्कचे महापौर म्हणून निवडले जाऊ शकतात, तर खान लंडनचे महापौर म्हणून निवडले जाऊ शकतात, परंतु भारतात कोणताही मुस्लीम विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकत नाही. मदनी म्हणाले, "आणि जर कोणी असे केले तर त्यांना आझम खान सारखे तुरुंगात पाठवले जाईल. भाजप नेत्यांनी यावर मदनीवर टीका केली. तसेच दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासाला जातीय रंग देत असल्याचाही आरोप केला.

अटकेतील मौलवीला डॉक्टरकडून हवे सहा महिन्यांचे थकीत भाडे हरियाणाच्या मेवात येथील मौलवी इश्तियाक याचे अल फलाह विद्यापीठाजवळ घर आहे. त्याने दिलेल्या भाड्याच्या खोलीतून अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट व सल्फरसह २,५०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान मौलवी इश्तयाकने सांगितले की, गनई व उमरने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्याशी संपर्क साधला. त्याच्या घरी खतांसारख्या काही वस्तू ठेवण्यासाठी विचारणा केली होती. त्याच्या बदल्यात २,५०० रुपये महिना भाडे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तेथे नेमके काय ठेवले जाणार आहे, याची इश्तियाकला कल्पना नव्हती. सहा महिन्यांपासून त्याचे भाडे थकीत आहे, तेवढे मिळवून द्या. चौकशीदरम्यान गनईने इश्तियाकच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctors' brainwashing on social media since 2019: Terror module exposed.

Web Summary : Doctors linked to a terror module were radicalized via social media since 2019. Pakistan-based handlers used digital platforms to recruit professionals. The module members learned to create IDs for attacks online. A cleric claims unpaid rent from a doctor linked to explosives.
टॅग्स :Blastस्फोटdelhiदिल्लीterroristदहशतवादी