शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:01 IST

दिल्लीमध्ये भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला आहे. यातून आम आदमी पक्षाची मोठी पडती बाजूच भाजपाच्या हाती लागली आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेला सडकून मार खाणाऱ्या आपला दिल्ली विधानसभा काहीही करून टिकवायची आहे. तर देशावर बहुमत असणाऱ्या भाजपाला राजधानी काबीज करायची आहे. गेल्या वेळी बहुमत न मिळाल्याने भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. फेरनिवडणुकीमध्ये भाजपासह काँग्रेसला आपने अक्षरश: झोपविले होते. हा पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपाच्या धुरीणांना नुकताच केलेला सर्व्हे खुनावू लागला आहे. 

दिल्लीमध्ये भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला आहे. यातून आम आदमी पक्षाची मोठी पडती बाजूच भाजपाच्या हाती लागली आहे. यामुळे भाजपा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी रणनीती राबविणार आहे. यासाठी भाजपामध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकांची पहिली पसंती आहे. त्यांनी दिलेली मोफत वीज, पाणी, मोहल्ला क्लिनिक आणि अन्य सुविधा दिल्लीकरांवर गारूड करून आहेत. यामुळे भाजपाला वेगळी रणनीती आखण्याची गरज भासू लागली आहे. 

दिल्लीमधील महानगरपालिका या भाजपाच्या ताब्यात आहेत. तर लोकसभा मतदारसंघही भाजपाकडेच आहेत. मात्र, राज्य काही भाजपाच्या ताब्यात आलेले नाही. याचेच शल्य भाजपाच्या दिल्लीत बसणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना सतावत आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी भाजपाने प्रत्येक मतदारसंघात अनुभवी कार्यकर्त्यांची टीमच तैनात केली आहे. दिल्लीकरांची केजरीवालांना पसंती, तर स्थानिक आमदारांबाबत राग असल्याचे भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये पुढे आले आहे. यामुळे स्थानिक समस्या, मुद्द्यांना हवा दिली जाणार आहे. केजरीवालांच्या योजनांविरोधात मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणे, आप सरकार आणि त्यांच्या आमदारांची पोलखोल करणे अशी रणनिती असणार असल्याचे भाजपाच्या नेत्याने सांगितले. 

स्थानिक आमदारांनी दिलेली आश्वासनांची पोलखोल आणि प्रत्यक्षातील माहिती समोर ठेवली जाणार आहे. तसेच स्थानिक विकासासाठी एक रोडमॅपही ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूक