शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोहल्ला क्लिनिक ते कॅग अहवाल... दिल्लीत भाजप सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, ५ मोठे निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:38 IST

दिल्लीचे नवे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी दिल्ली सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. रेखा गुप्ता यांनी गुरुवारी (दि.२०) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह ६ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर लगेचच दिल्लीचे नवे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी दिल्ली सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्याबद्दल जाणून घ्या...

मोहल्ला क्लिनिकची चौकशीआज आरोग्य विभागाबाबत एक बैठक बोलावण्यात आली. यावेळी आरोग्य आणि वाहतूक मंत्री पंकज सिंह म्हणाले की, दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकची चौकशी केली जाईल. औषधांच्या कमतरतेपासून ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनपर्यंत, प्रत्येक गोष्टीची चौकशी केली जाईल. तसेच, जर काही अनियमितता आढळली तर कारवाई केली जाईल, असे पंकज सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले. 

महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरूच राहीलपंकज सिंह यांनी मोफत बस प्रवासाबाबत सुद्धा मोठे विधान केले आहे. दिल्ली बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास सुरूच राहील. यामध्ये कोणताही बदल केला जात नाही, असेही पंकज सिंह यांनी सांगितले.

वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टातदिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेत म्हटले आहे की, मागील आप सरकारने इतर ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ विभागात हजर राहण्यास सांगितले आहे. याशिवाय, माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टात आणण्यात आल्या आहेत.

आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागूदिल्ली सरकारने आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत कार्डधारक नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये या उपचारांचा लाभ घेऊ शकतात, ज्याचा संपूर्ण खर्च सरकार करते. यामध्ये दिल्ली सरकारकडून ५ लाख रुपयांचे आणि केंद्र सरकारकडून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा देण्यात येईल.

कॅग अहवाल सादर होणारयाचबरोबर, दिल्ली सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅग अहवाल सादर करण्याबाबत निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कॅगचे १४ अहवाल प्रलंबित आहेत, जे मागील सरकारने विधानसभेत सादर केले नाहीत. हे अहवाल विधानसभेच्या पहिल्याच सत्रात सादर केले जातील.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपा