शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिल्लीत भाजप आणि आपच्या नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 23:22 IST

भाजप आणि आपचे नेते बुधवारी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात (EDMC) जमले होते. सभागृहाच्या बैठकीदरम्यान भाजप नगरसेवकांनी निंदा प्रस्ताव आणला होता.

नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून भाजप आणि आम आदमी पार्टीतील संघर्ष वाढत चालला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चित्रपटासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्ष अनेक वेळा एकमेकांना भिडले आहेत. सीएम केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या गदारोळानंतर आता पूर्व दिल्लीतील महापालिकेच्या सभागृहात भाजप आणि आपचे नेते आमनेसामने आले. येथेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बाचाबाचीही झाली. एवढेच नाही, तर यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीएम केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून घमासान -भाजप आणि आपचे नेते बुधवारी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात (EDMC) जमले होते. सभागृहाच्या बैठकीदरम्यान भाजप नगरसेवकांनी निषेधाचा ठराव आणला होता. दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांची चेष्टा केली, असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. तसेच, सीएम केजरीवाल यांच्या वक्तव्याबद्दल आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली होती.

भाजपा आणि AAP च्या नगरसेवकांत तुंबळ हाणामारी -भाजप नगरसेवकांच्या मागणीवर आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. यानंतर प्रकरण एवढे वाढले की, आपचे नगरसेवक सभागृहनेत्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी गदारोळ सुरू केला. यानंतर, काही वेळातच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या हाणामारीत अनेक नेते जखमी झाले आहेत. तर काही नगरसेवकांचे कपडेही फाटले आहेत.

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सBJPभाजपाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल