दिल्ली विधानसभा- आपच्या पाचही रणरागिणी विधानसभेवर

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:17+5:302015-02-11T00:33:17+5:30

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय भविष्य आजमावणाऱ्या महिलांमध्ये आम आदमी पार्टीच्या सर्व पाचही उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यासह या पक्षाच्या सर्व महिला उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

Delhi Assembly - your five Ranaragini Legislative Assembly | दिल्ली विधानसभा- आपच्या पाचही रणरागिणी विधानसभेवर

दिल्ली विधानसभा- आपच्या पाचही रणरागिणी विधानसभेवर

ी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय भविष्य आजमावणाऱ्या महिलांमध्ये आम आदमी पार्टीच्या सर्व पाचही उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यासह या पक्षाच्या सर्व महिला उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
विजयी महिला उमेदवारांमध्ये राखी बिर्ला, वंदना कुमार, अलका लांबा, भावना गौर आणि प्रमिला टोकस यांचा समावेश आहे. या सर्व आपच्या उमेदवार आहेत. २०१३ च्या निवडणुकीत आपच्या तीन महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.
दुसरीकडे भाजपाकडून रिंगणात उतरलेल्या किरण बेदी, नुपूर शर्मा, रजनी अब्बी आणि कृष्णा तिरथ यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या तिरथ यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपात प्रवेश केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Delhi Assembly - your five Ranaragini Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.