दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने 'आप' संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्लीतून ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. तर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांना बादलीमधून तिकीट देण्यात आले आहे.
याशिवाय, काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत अनिल चौधरी यांना पटपडगंजमधून तिकीट दिले आहे. या जागेवर त्यांची लढत आम आदमी पार्टीचे उमेदवार अवध ओझा यांच्यासोबत असेल. मुस्तफाबादमधून काँग्रेसने अली मेहदी यांना रिंगणात उतरवले आहे. येथे त्यांचा सामना 'आप'च्या आदिल अहमद खान यांच्याशी असेल. तसेच, सीलमपूरमधून काँग्रेसने अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली आहे. येथे त्यांचा सामना 'आप'चे झुबेर चौधरी यांच्याशी असेल.
काँग्रेसने पहिल्या यादीत नरेलमधून अरुणा कुमारी यांना उमेदवारी दिली आहे. येथे त्याची लढत आम आदमी पार्टीचे उमेदवार दिनेश भारद्वाज यांच्याशी असेल. तर छतरपूरमधून काँग्रेसने राजिंदर तंवर यांना मैदानात उतरवले आहे. येथे आपने ब्रह्म सिंह तंवर यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.