भाजप नेते तथा गृह मंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यासंदर्भात मोठे विधान केले आहे. अमित शाह म्हणाले, त्यांनी चार बंगले तोडून, 51 कोटी रुपये खर्च करून 'शीश महल' तयार केला. हा दिल्लीतील गरीबांचा पैसा आहे. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून राजकारणात आलेल्या केजरीवाल यांनी हजारोंचा भ्रष्टाचार केला आहे आणि दिल्लीतील जनतेला धोका दिला आहे.
केजरीवाल सरकारने हजारोंचा भ्रष्टाचार केला, दिलेली आश्वासने मोडली - दिल्लीमध्ये एका रोड शो दरम्यान न्यूज18इंडिया सोबत बोलताना गृहमंत्री शाह म्हणाले, "केजरीवाल सरकारने हजारोंचा भ्रष्टाचार केला आहे आणि दिलेली आश्वासने मोडली आहेत. शाह म्हणाले, ते म्हणाले होते, गाडी घेणार नाही. त्यांनी गाडी घेतली. ते म्हणाले होते, बंगला घेणार नाही. पण त्यांनी बंगलाही घेतला. सर्व सुविधा घेतल्या. त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. तर दुसरीकडे, नरेंद्र मोदी सरकारकडे पहा, त्यांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. यावेळी दिल्लीतील जनतेने ५ फेब्रुवारीला या संकटातून मुक्त होण्याचा निश्चय केला आहे."
केजरीवाल यांच्या बोलण्यावर दिल्लीतील जनतेला विश्वासन नाही - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या यमुना नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा केंद्र स्थानी आला आहे. या मुद्द्यावरून भाजप आम आदमी पक्षाला घेरताना दिसत आहे. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात, सरकारमध्ये आल्यास यमुना नदी तीन वर्षांत स्वच्छ करू, असे आश्वासनही दिले आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी यमुना नदीतील पाण्यासंदर्भात 'जल आतंकवाद' म्हणत जो आरोक केला होत्या, त्या संदर्भात विचारले असता, शाह म्हणाले, "यासंदर्भात सार्वजनिक सभेत बोलेन. मात्र, त्यांच्या (केजरीवाल) कोणत्याही विधानावर आता दिल्लीतील जनतेला विश्वासन राहिलेला नाही."