शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Assembly Election Results 2025: "और लडो आपस में...!" दिल्ली विधानसभा निकालात भाजपला मोठी आघाडी, उमर अब्दुल्लांचा काँग्रेस-AAP वर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:50 IST

Delhi Assembly Election Results 2025: एक्झिटपोल खरे ठरताना दिसत आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना आणि आप पराभूत होताना दिसत आहे.

आज दिल्ली विधानसभा निवडमुकीचे निकाल येत आहेत. सर्व 70 जागांवरील कल समोर आले आहेत. आतापर्यंतत्या निकालात भाजपला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. यातच आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला आहे. "और लडो आपस में", असे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.  

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीसंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात असे होऊ शकले नाही. दिल्लीपूर्वी हरियाणामध्येही काँग्रेस आणि आप यांच आघाडी होऊ शकली नव्हती. तेव्हा हरियाणामध्ये भाजपला सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला. यामुळे, आता पुन्हा एकदा दिल्लीच्या निकालात भाजपला मिळत असलेल्या आघाडीवरून उमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेसवर अशा शब्दात साधलेला हा निशाणा बरेच काही सांगणार आहे.

शेअर केला 'महाभारत' मालिकेतील सीन -सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'महाभारत' मालिकेतील एक सीन शेअर करत उमर अब्दुल्ला यांनी केवळ "और लडो आपस में!"  एवढेच लिहिले आहे. आज येत असलेले दिल्ली विधानसभेचे निकाल आणि त्यांची ही पोस्ट, यावरून दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपने वेगवेगळे निवडणूक लढण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आहे, हे स्पष्ट होते.

खरे ठरताना दिसत आहेत एक्झिटपोल -खरे तर, एक्झिट पोलचे निकाल हे काँग्रेससाठी मोठा धक्का होता. कारण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र यावेळी काँग्रेसला काहीशा आशा होत्या. पण, एक्झिट पोलने त्याही धुसर केल्या. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, एक्झिटपोल खरे ठरताना दिसत आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना आणि आप पराभूत होताना दिसत आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Omar Abdullahउमर अब्दुल्लाcongressकाँग्रेसAAPआपBJPभाजपा