शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच होणार दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा! अमित शाहांच्या घरी महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:28 IST

Delhi Assembly Election Result 2025: 27 वर्षांनंतर भाजपने दिल्लची सत्ता काबीज केली. आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Delhi Assembly Election Result 2025: काल, म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. तब्बल 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीतील 70 पैकी 48 जागा भाजपल्या मिळाल्या, तर आपला फक्त 22 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, भाजपच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दिल्लीत सरकार स्थापनेबाबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत जेपी नड्डा, बैजयंत पांडा आणि बीएल संतोषसारखे पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीपदासाठीच्या नावांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली भाजपाध्यक्ष आमदारांची भेट घेणार मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आज संध्याकाळी सर्व विजयी आमदारांची भेट घेणार आहेत. यादरम्यान ते सर्वांचे अभिनंदन करतील आणि सरकार स्थापनेबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शनिवारी संध्याकाळी भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शहा यांच्यासोबत शपथविधी आणि दिल्लीत स्थापन होणाऱ्या सरकारची रूपरेषा यावर चर्चा झाली.

पीएम मोदींच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठरणारपंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 14 फेब्रुवारीच्या रात्री पंतप्रधान मोदी परतणार आहेत. त्यानंतरच दिल्लीत शपथविधी होऊ शकतो. हा शपथविधी सोहळा भव्य असेल. यामध्ये एनडीएच्या नेत्यांचा सहभाग अपेक्षित आहे. याशिवाय एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलावण्यात येणार आहे.

आतिशी यांचा राजीनामा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (आप) दारुण पराभव झाल्याच्या एका दिवसानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पक्षाचा दारुण पराभवाला झाला असला तरी, आतिशी कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांच्यासह अनेकांचा पराभव झाला आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआपAmit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवाल