Delhi assembly election: BJP will be able to select many candidates for the selection of candidates | दिल्ली विधानसभा निवडणूक: उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप करणार अनेक सर्व्हे
दिल्ली विधानसभा निवडणूक: उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप करणार अनेक सर्व्हे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दमदार विजयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय मुद्दे आणि चांगल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी अनेक सर्व्हे करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजप अनेक आघाड्यांवर काम करीत आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीत मिळालेली ५५ टक्के मते पुन्हा मिळवीत पुढल्या वर्षी होणारी दिल्ली विधानसभेची निवडणूक आरामात जिंकता येईल.

अलीकडेच पार पडलेल्या दिल्ली भाजप नेत्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपच्या पारड्यात पडलेली ५५ टक्के मते विधासभा निवडणुकीत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, असे भाजपचे संघटन सचिव सिद्धार्थन यांनी सांगितले. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसोबतच दिल्ली विधानसभेची निवडणूक मुदतीआधी होण्याची शक्यता विचारात घेऊन भाजपने बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघनिहाय विशेष मुद्दे ठरविणे, भाजप आमदारांसोबत दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारच्या कामगिरीचे आकलन करणे आणि योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी नेत्यांच्या लोकप्रियतेचे विश्लेषण करण्यासाठी तीन टप्प्यांत सर्वेक्षण करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

२०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून भाजपचा पराभव केला होता. तथापि, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीपेक्षा भाजपला ६७ मतदारसंघांत जास्त मते मिळाली होती. त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप विजयी होईल, अशी आशा भाजप नेते बाळगून आहेत. दोन दशकांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव ओसरला आहे, तेव्हा यावेळी भाजप निश्चित विजयी होईल अशी आशा आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. वेगवेगळ्या वस्त्यांत रात्री मुक्काम करून तेथील लोकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी अनधिकृत झोपडपट्ट्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत, असेही त्या नेत्याने सांगितले.

निश्चित विजय होण्याची आशा
दोन दशकांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव ओसरला आहे, तेव्हा यावेळी भाजप निश्चित विजयी होईल अशी आशा आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.


Web Title: Delhi assembly election: BJP will be able to select many candidates for the selection of candidates
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.