शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ते दोन फोन कॉल्स, २४ तासांत झाला गेम, ‘इंडिया’मधून काँग्रेस अशी झाली वजा    

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:27 IST

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर करतानाच इंडिया आघाडीमधून काँग्रेसलाच वजा करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससमोर उभी असलेली आव्हानं अधिकच खडतर होताना दिसत आहेत. त्यातच दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आहे आमने-सामने आले असताना काँग्रेसच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीलाही तडे जाताना दिसत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर करतानाच इंडिया आघाडीमधून काँग्रेसलाच वजा करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपर्यंत देशामधील विरोधी पक्षांच्या ऐक्याचं नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष एकाकी पडताना दिसत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला काँग्रेस आणि भाजपाविरोधात लढण्यासाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष आमने सामने असल्याने इतर प्रादेशिक पक्षांपैकी काही पक्ष आपल्याला साथ देतील किंवा तटस्थ राहतील, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेतृत्वाला होती. मात्र प्रत्यक्षात बहुतांश विरोधी पक्षांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या २४ तासांत घडलेल्या घडामोडी आणि दोन फोन कॉल्स यांच्या माध्यमातून मित्रपक्षांनीच कांग्रेसला एकटं पाडलं आहे.

त्याचं झालं असं की, हरयाणा आणि महाराष्ट्रातील पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीमध्ये आक्रमकपणे लढण्याची रणनीती आखली होती. त्याचा परिणामही दिसून येत होता. काँग्रेसने इंडिया आघाडीतील आपला सहकारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. मात्र याचं निमित्त करून काँग्रेसलाच इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी मित्रपक्षांकडे केली. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव या इंडिया आघाडीतील प्रभावी नेत्यांनी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडी अवघ्या २४ तासांमध्ये घडल्या.

यादरम्यान, मंगळवारी अखिलेश यादव यांनी अरविंद केजरीवाल यांना फोन केला. तसेच दिल्लीमध्ये आमाजवादी पक्ष आम आदमी पक्षाला पाठिंबा देईल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांना ममता बॅनर्जी यांनीही फोन केला. त्यांनीही अरविंद केजरीवाल  यांच्या पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला. केजरीवाल यांनीही तातडीने सोशल मीडियावरून या दोन्ही नेत्यांचे आभार मानले. अशा प्रकारे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या लढाईल अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी कांग्रेसला इंडिया आघाडीतून वजा करून टाकले.  एवढंच नाही तर अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्यानंतर उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव या नेत्यांनीही काँग्रेसऐवजी आपलं वजन आपच्या पारड्यात टाकलं. तेजस्वी यादव यांनी तर इंडिया आघाडी ही केवळ लोकसभेपुरती होती, असं सांगून टाकलं. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष एकटा पडला आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेस पक्ष दिल्लीत कशी लढत देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसAAPआपSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूक