शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

Delhi Election Results 2025 Live: विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार, भ्रष्टाचाराची चौकशी होणार - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2025 20:27 IST

Delhi Election 2025 Result Live Update:  देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी ...

08 Feb, 25 08:28 PM

विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार - पंतप्रधान मोदी

आपदावाल्यांनी त्यांचा प्रत्येक घोटाळे लपवण्यासाठी रोज नवीन षडयंत्र रचले. पण आता दिल्लीचा जनादेश आला आहे. मी गॅरंटी देत आहे की पहिल्या विधानसभा अधिवेशनातच कॅगचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी होणार आहे. ज्याने लूट केली आहे ती परत करावी लागेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

08 Feb, 25 07:29 PM

पूर्वीची सरकारे शहरीकरणाला ओझे मानत होती - पंतप्रधान मोदी

"शेजारील राज्यात भाजपची सरकारे आहेत, हा अतिशय आनंददायी योगायोग आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या सर्व भागात भाजपची सरकारे एकत्र आली आहेत. हा एक योगायोग प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. या संपूर्ण परिसरात मोबिलिटीवर भरपूर काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आज देश झपाट्याने शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे. पूर्वीची सरकारे शहरीकरणाला ओझे आणि आव्हान मानत होती. माझे मत आहे की शहरीकरण ही एक संधी आहे. शहरीकरण हे गरीब आणि वंचितांना सक्षम करण्याचे माध्यम आहे. दिल्ली हे भारताचे प्रवेशद्वार आहे, म्हणून ते भारतातील सर्वोत्तम पायाभूत सुविधांना पात्र आहे. आता आम्ही दिल्लीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

08 Feb, 25 07:24 PM

डबल इंजिनचे सरकार रात्रंदिवस काम करणार - पंतप्रधान मोदी

"आज अयोध्येतील मिल्कीपूरमध्येही भाजपला विजय मिळाला. प्रत्येक वर्गाने मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केले आहे. दिल्लीतील निषेधाचे राजकारण, संघर्ष आणि प्रशासकीय अनिश्चिततेमुळे दिल्लीतील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. आज तुम्ही सर्व दिल्लीकरांनी दिल्लीच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर केला आहे. या लोकांनी मेट्रोचे काम रोखले, यांनी झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यापासून रोखले, यांनी दिल्लीतील लोकांना आयुष्मान योजनेचा लाभही मिळू दिला नाही. आता दिल्लीतील जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की, त्यांना सुशासन हवे आहे. त्यांनी डबल इंजिनचे सरकार निवडले असून दिल्लीच्या जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करू," असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.

08 Feb, 25 07:05 PM

शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना जनतेने शॉर्टकट दाखवला- पंतप्रधान मोदी

"राजकारणात शॉर्टकट आणि लबाडीला स्थान नाही. जनतेने शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना शॉर्टकट दाखवला.  लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने मला कधीही निराश केले नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीच्या जनतेने भाजपला सात जागांवर विजय मिळवून दिला. दिल्लीची सेवा करू न शकल्याची वेदना माझ्या मनात होती. पण आज दिल्लीनेही माझी विनंती ऐकली. २१व्या शतकात जन्मलेल्या पिढीला पहिल्यांदाच दिल्लीत भाजपचे सुशासन दिसेल. भाजपच्या सुशासनावर देशाचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आम्ही पहिल्यांदा हरियाणात अभूतपूर्व विक्रम केला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा विक्रम झाला. आता दिल्लीत नवा इतिहास रचला आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

08 Feb, 25 06:57 PM

दिल्लीतून आपदा दूर झाली आहे - पंतप्रधान मोदी

"हा ऐतिहासिक विजय आहे, हा सामान्य विजय नाही. दिल्लीतून आपदा दूर झाली आहे. दशकभराच्या आपदामधून दिल्ली मुक्त झाली आहे. मित्रांनो, दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे. आज दिल्लीत विकास, दृष्टी आणि विश्वास यांचा विजय झाला आहे. आज दिल्लीला वेठीस धरणारा दिखाऊपणा, अराजकता, अहंकार आणि आपदाचा पराभव झाला आहे. या निकालात भाजप कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनत या विजयात भर घालत आहे. तुम्ही सर्व कार्यकर्ते या विजयासाठी पात्र आहात. या विजयाबद्दल भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

08 Feb, 25 06:53 PM

आमच्या हमीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबापुढे नतमस्तक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

"आज दिल्लीतील लोकांमध्ये उत्साह आणि शांतता आहे. उत्साह विजयाचा आहे आणि शांतता दिल्लीला संकटातून मुक्त करण्याचा आहे. २१ व्या शतकात भाजपला सेवेची संधी द्यावी, असे आवाहन मी दिल्लीत केले होते. दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्याची संधी भाजपला द्या. मोदींच्या हमीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबापुढे नतमस्तक आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

08 Feb, 25 06:41 PM

पंतप्रधान मोदी दिल्लीच्या जनतेच्या मनात राहतात: जेपी नड्डा

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यादरम्यान त्यांनी विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले. त्यांनी दिल्लीतील लोकांचे आभारही व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. यामुळे आम्ही इतिहास घडवला. आधी लोकसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला सर्व सात जागांवर विजय मिळवून दिला. यानंतर विधानसभा निवडणुकीत ४८ जागा आमच्या झोळीत टाकल्या. या अर्थ स्पष्ट आहे की पंतप्रधान मोदी हे दिल्लीच्या जनतेच्या मनात राहतात.

08 Feb, 25 06:39 PM

केजरीवाल आता कधीही सत्तेत परतणार नाहीत: भाजप खासदार मनोज तिवारी

भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचा अभिमान आहे आणि आम्ही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानतो. अरविंद केजरीवाल पुन्हा कधीही सत्तेत येणार नाहीत या पंतप्रधान मोदींच्या हमीवर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे.

08 Feb, 25 06:38 PM

नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल ४,०८९ मतांनी पराभूत

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे प्रवेश वर्मा यांनी ४,०८९ मतांनी पराभव केला.

08 Feb, 25 04:57 PM

पंतप्रधान मोदींच्या 'गॅरंटी'वर लोकांनी विश्वास दाखवला: बांसुरी स्वराज

दिल्लीच्या विजयाबद्दल भाजपा खासदार बांसुरी स्वराज म्हणाल्या की, या ऐतिहासिक विजयाबद्दल आम्ही दिल्लीतील जनतेचे आभार मानू इच्छितो. दिल्लीकरांनी पंतप्रधान मोदींच्या 'गॅरंटी'वर विश्वास दाखवला आहे. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल दिल्लीकरांचे आभार. दिल्लीकरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू.

08 Feb, 25 03:44 PM

"विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, भाजपला शुभेच्छा..."; दिल्ली पराभवावर केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात त्यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मी भाजपाला विजयाच्या शुभेच्छा देतो. मी अशी अपेक्षा करतो की दिल्लीच्या जनतेने भाजपला ज्या गोष्टींसाठी मतं दिली आहेत, ती विधायक कामे भविष्यात भाजपकडून नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षात आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला. दिल्लीकरांना सर्व सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. दिल्लीतील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही आम्ही काम केले. आता आम्ही विरोधीपक्षाची भूमिकाही चोख पार पाडू. दिल्लीकरांच्या सुख-दु:खात आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत असू. आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांचे आभार...

 

08 Feb, 25 03:30 PM

दिल्ली विधानसभा निवडणूक; अशी आहे आतापर्यंतची स्थिती...

दिल्ली विधानसभा निवडणूक; अशी आहे आतापर्यंतची स्थिती -
निवडणूक आयोगानुसार, दिल्लीतील ७० जागांपैकी भाजपला २३ जागांवर विजय मिळाला असून २४ जागांवर आघाडीवर आहे. तर गेल्या निवडणुकीत 62 जागांवर विजय मिळवणारा आप (AAP) बहुमताच्या आकड्यापासून बराच दूर आहे. आतापर्यंत आपला ११ जागांवर विजय मिळाला आहे, तर १२ जागांवर आघाडीवर आहे. तसेच काँग्रेस शिवाय इतर पक्ष कुठेही दिसत नाहीत...
 

08 Feb, 25 03:29 PM

दिल्लीत पराभव...! AAP कार्यालयाचे दरवाजे आतून बंद; कुणालाही 'प्रवेश' नाही

आपच्या मुख्यालयाचे मुख्य गेट आतून बंद करण्यात आले आहे. कोणालाच प्रवेश दिला जात नाहीय. या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला आत प्रवेश देण्यासाठी कार्यकर्ते फोनाफोनी करताना दिसत आहेत. केजरीवाल पराभवाच्या छायेत असल्याचे दिसत असतानाच गेटच बंद करून घेण्यात आले...

08 Feb, 25 02:39 PM

"'आप'ला जिंकवण्याची जबाबदारी आमची नाही, दिल्लीच्या निकालांनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेस आपच्या सोबत असती तर असा निकाल लागला नसता, असं आप आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून वारंवार सांगण्यात येतंय, असं विचारलं असता सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी आम्ही उचललेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही आहोत, आम्हीही राजकीय पक्ष आहोत, असे श्रीनेत यांनी सांगितले.

08 Feb, 25 02:27 PM

दिल्लीत भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त - अमित शाह

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, "दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त करत दिल्लीला संकटमुक्त केलं आहे. जे लोक दिलेली आश्वासने पाळत नाहीत, अशा लोकांना दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवला आहे," असा टोला शाह यांनी लगावला आहे. 

08 Feb, 25 02:26 PM

'एका निर्लज्ज, चारित्र्यहीन व्यक्तीपासून दिल्लीला मुक्ती मिळाली' - कुमार विश्वासां

कुमार विश्वास म्हणाले, "आम आदमी पक्षाचे ते सगळे लाखो-कोट्यवधी कार्यकर्ते, जे अण्णा आंदोलनातून पुढे आले. ज्यांचे खूप निर्मळ, निष्पाप आणि भारताच्या राजकारणाला बदलण्याच्या स्वप्नाची हत्या एका निर्लज्ज, नीच, मित्राला धोका देणाऱ्या चारित्र्यहीन व्यक्तीने केली.  त्याच्याप्रती काय संवेदना व्यक्त करायच्या. दिल्लीला त्याच्यापासून मुक्ती मिळाली", अशी टीका कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवालांवर केली.  

08 Feb, 25 01:43 PM

आप नेत्या तथा मुख्यमंत्री आतिशी कालकाजी मतदारसंघातून विजयी

आप नेत्या तथा मुख्यमंत्री आतिशी कालकाजी मतदारसंघातून विजयी, त्यांनी रमेश बिधुडी यांचा  पराभव केला.

08 Feb, 25 01:08 PM

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मा विजयी, अमित शाह यांची भविष्यवाणी खरी ठरली

दिल्लीत काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल त्यांच्या मतदारसंघात पराभूत होत आहेत अशी भविष्यवाणी केली होती. ती आज खरी ठरली आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून कधी आघाडीवर कधी पिछाडीवर असा पाठशिवणीचा रंगलेला खेळ आता संपला आहे. अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत. 

08 Feb, 25 12:54 PM

"अंतत: दिल्ली में आपदा टली" - संजय निरुपम 

"अखेर दिल्लीत 'आपदा' टळली" अशी पोस्ट शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केले आहे.

 

08 Feb, 25 12:45 PM

"दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न...!" आप काँग्रेसवरही संजय राऊतांचं मोठं विधान

"दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला आहे आणि महाराष्ट्र पॅटर्न जसा आहे, त्याच पद्धतीने दिल्लीतही काम सुरू होते. निवडणूक आयोग डोळे बंद करून बसला होता. जर आप आणि काँग्रेस एकत्रितपणे लढले असते, तर दिल्लीच्या निकालात पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव शिश्चित झाला असता", असेही शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

08 Feb, 25 11:43 AM

आठव्या फेरीनंतर अरविंद केजरीवाल पिछाडीवर, प्रवेश वर्मांनी घेतली ४३० मतांची आघाडी

आठव्या फेरीतील मतमोजणीनंतर अरविंद केजरीवाल पिछाडीवर, प्रवेश वर्मांनी घेतली ४३० मतांची आघाडी

08 Feb, 25 12:05 PM

मद्य घोटाळ्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा पराभव, अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया

मद्य घोटाळ्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा पराभव, अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया 

08 Feb, 25 11:41 AM

''आता अरविंद केजरीवाल यांचं तिहारमध्ये जाणं निश्चित'', भाजपा खासदार योगेश चंडोलिया यांचा दावा

''आता अरविंद केजरीवाल यांचं तिहारमध्ये जाणं निश्चित'', भाजपा खासदार योगेश चंडोलिया यांचा दावा

08 Feb, 25 11:04 AM

Delhi Election 2025 Result: ''आम्ही मुद्दे उपस्थित केले, मात्र जनतेला वाटलं...'', काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांची प्रतिक्रिया

''आम्ही मुद्दे उपस्थित केले, मात्र जनतेला वाटलं की आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही '', काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांची प्रतिक्रिया 

08 Feb, 25 10:51 AM

Delhi Election 2025 Result: दिल्लीतील मतदारांनी भ्रष्टाचाराविरोधात मतदान केलं, भाजपा प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची प्रतिक्रिया

दिल्लीतील मतदारांनी भ्रष्टाचाराविरोधात मतदान केलं, कलांमध्ये भाजपाला आघाडी मिळाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची प्रतिक्रिया

08 Feb, 25 10:51 AM

Delhi Election 2025 Result: दिल्लीत आकडे स्थिरावले, भाजपा ४० तर आप ३० जागांवर आघाडीवर

मतमोजणीला ३ तास पूर्ण होत असताना दिल्लीत आकडे स्थिरावले असून, भाजपा ४० आणि  आप ३० जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही

08 Feb, 25 10:38 AM

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये आघाडी घेतल्यानंतर भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये आघाडी घेतल्यानंतर भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात

08 Feb, 25 10:11 AM

दिल्लीतील मतमोजणीचे दोन तास पूर्ण, भाजपाची आघाडी घटली, आपकडून पुनरागमनाचे संकेत

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे दोन तास पूर्ण झाले असून, सुरुवातीला जोरदार आघाडी घेणाऱ्या भाजपाची आता काहीशी पिछेहाट झाली असून, आपने पुनरागमनाचे संकेत दिले आहे. सध्याच्या कलांमध्ये भाजपा ३९ तर आप ३० आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. 

08 Feb, 25 09:47 AM

निवडणूक आयोगाच्या कलांमध्येही भाजपाने पार केला बहुमताचा आकडा

निवडणूक आयोगाच्या कलांमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत ५२ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपा ३६ आणि आम आदमी पक्ष १६ जागांवर आघाडीवर आहे. तर या कलांमध्ये काँग्रेसच्या खात्यात अद्याप एकही जागा गेलेली नाही

08 Feb, 25 09:30 AM

मतमोजणीदरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी हनुमान मंदिरात घेतलं दर्शन

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी हनुमान मंदिरात घेतलं दर्शन
 

08 Feb, 25 09:12 AM

आमच्या पाठिंब्याशिवाय दिल्लीत सरकार स्थापन होऊ शकणार नाही, काँग्रेस नेत्यांचा दावा

काँग्रेसला दिल्लीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळतील, तसेच आमच्या पाठिंब्याशिवाय दिल्लीत सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा दावा काँग्रेसचे नेते विशेष टोकस यांनी केला आहे. 

08 Feb, 25 09:07 AM

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर, कालकाजीमधून रमेश बिधुडी यांनी घेतली आघाडी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर पडल्या आहेत, कालकाजी विधानसभा मतदारसंघामधून भाजपाचे रमेश बिधुडी यांनी आघाडी घेतली आहे.  

08 Feb, 25 08:48 AM

दिल्ली विधानसभेच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला बहुमत, घेतली ३६ जागांवर आघाडी

दिल्ली विधानसभेच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत ६० जागांचे कल समोर आले असून, त्यामध्ये भाजपाने ३६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप २३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे

08 Feb, 25 08:32 AM

अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणार, आतिशी यांनी व्यक्त केला विश्वास

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार असा विश्वास दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी मनमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी  व्यक्त केला. 

08 Feb, 25 08:30 AM

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आप-भाजपामध्ये अटीतटीची लढत

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीच्या कलांमध्ये आप-भाजपामध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. आतापर्यंत ३५ जागांवरील कल समोर आले असून, त्यात भाजपा २०, आप १४ आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे

08 Feb, 25 08:17 AM

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीdelhiदिल्ली