शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 17:01 IST

Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचे आवाहन केले आहे.

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मतदारांना आर्थिक मदतीचे आवाहन केले असून, क्राऊड फंड मोहीम सुरू केली आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला 40 लाख रुपये हवे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अवघ्या चार तासांतच त्यांना 10 लाख रुपयांहून अधिकची देणगी मिळाली आहे. दरम्यान, यावर काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनी बोचरी टीका केली आहे. 

अलका लांबा म्हणतात की, 'आतिशी आज लोकांकडून पैसे मागत आहे. त्या प्रामाणिक असतील, तर त्यांनी स्वतःच्या पैशाने निवडणूक लढवावी. त्यांनी मद्य घोटाळा कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. आता दिल्लीकरांची फसवणूक होणार नाही. केजरीवाल आणि भाजपने मिळून दिल्लीचा नाश केला. दिल्लीतील जनता आता काँग्रेसकडे आशेने पाहत आहे,' अशी टीका लांबा यांनी केली.

आतिशी यांनी काय आवाहन केले ?'डोनेट फॉर आतिशी' मोहिमेचा शुभारंभ करत सीएम आतिशी यांनी ट्विट केले की, 'मागील पाच वर्षांपासून तुम्ही आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्री म्हणून माझ्यासोबत आहात. तुमच्या पाठिंब्याशिवाय आणि आशीर्वादाशिवाय हे शक्य झाले नसते. एक तरुण आणि सुशिक्षित महिला म्हणून, तुमचा विश्वास आणि दानशूरता यामुळे मला राजकारणात करिअर करण्याचे स्वप्न पाहायला मिळाले. एक अशी वाट ज्यावर मी एकटी चालू शकत नव्हते. आता आणखी एक निवडणूक आपल्यासमोर आहे आणि मला तुमची पुन्हा गरज आहे. माझ्या क्राउड फंडिंग मोहिमेत योगदान द्या,' असे आवाहन त्यांनी केले.

भाजपचे कपिल मिश्रा म्हणाले...दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा यांनीदेखील आतिशी यांच्या आवाहनावर टीका केली. 'यापूर्वी एनआरआय आणि देशभरातील लोक 'आप'ला पैसे द्यायचे, आज मीडियामध्ये येऊन क्राउड फंडिंग करावी लागतीये, ही त्यांची दुर्दशा आहे. हे लोक जनतेपासून दूर गेले आहेत, त्यांचा पराभव अटळ आहे,' अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :AAPआपcongressकाँग्रेसdelhiदिल्लीBJPभाजपा