शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:36 IST

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी 'रेवडी पर चर्चा' या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

Delhi Assembly Election 2025 : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा दिल्ली विधानसभा निवडणुकीवार लागल्या आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुका होणार असून, राज्यातील सत्ताधारी AAP ने याच्या तयारीला सुरुवात केली आहे. नुकतीच पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पक्षाच्या 'रेवडी पर चर्चा' कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 

रेवाडी मोहिमेचा शुभारंभ करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आजपासून रेवडी मोहिमेला सुरुवात होत असून, आम्ही हे 'रेवडी पर चर्चा' अभियान प्रत्येक गल्लीपर्यंत घेऊन जाणार आहोत. दिल्लीच्या जनतेला मोफत सुविधा हव्या आहेत की नाही, हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. दिल्लीच्या जनतेच्या पैशातून आम्ही त्यांना मोफत सुविधा देत आहोत, मग यात काय अडचण आहे? यावेळी केजरीवालांनी सहा रेवड्यांचा उल्लेखही केला. यासोबतच त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

भाजपशासित राज्यात वीज पुरवठा खंडीत होतोदिल्लीत भाजपची आल्यास वीज आणि पाण्याची बिले भरावी लागतील, असे केजरीवाल म्हणाले. ते पुढे म्हणतात, दिल्लीत कधीही वीज कपात होत नाही. पण, भाजपशासित 20 राज्यांमध्ये 24 तास वीज नसते. गुजरातमध्ये 30 वर्षांपासून सरकार आहे. 30 वर्षांतही तेथे 24 तास वीज पुरवता आली नाही. दिल्लीतही भाजपचे सरकार आले, तर 8-10 तास वीजपुरवठा खंडित होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

'कमळाचे बटण दाबण्यापूर्वी विचार करा..'केजरीवाल पुढे म्हणतात, कमळाचे बटण दाबण्यापूर्वी विचार करा. भाजपशासित राजस्थानमध्ये किती तास वीजपुरवठा खंडित होतो? संपूर्ण देशात दिल्ली आणि पंजाब ही दोनच राज्ये आहेत, जिथे आम आदमी पार्टीची सत्ता आहे आणि जिथे वीज मोफत दिली जाते. सरकार स्थापन होऊन जेमतेम 10 वर्षे झाली आहेत आणि आम्ही दिल्लीत 24 तास वीज मोफत देत आहोत. तुम्ही दिल्लीत भाजपला मतदान केले, तर तुम्हाला दर महिन्याला हजारो रुपयांचे वीज आणि पाणी बिल भरावे लागेल. 

केजरीवालांच्या सहा रेवड्या

  1. पहिली रेवडी- मोफत वीज, वीज कपात नाही
  2. दुसरी रेवडी - 20 हजार लिटर पाणी मोफत
  3. तिसरी रेवडी- मोफत आणि उत्कृष्ट शिक्षण
  4. चौथी रेवडी- उत्कृष्ट मोहल्ला क्लिनिक
  5. पाचवी रेवडी- महिलांसाठी मोफत बस प्रवास
  6. सहावी रेवाडी - वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा