शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला केजरीवालांची भीती का वाटते?, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:00 IST

'आम आदमी पार्टीचे सरकार आपल्या कामांचा हिशोब लोकांसमोर घेऊन जात आहे.'

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची का भीती वाटते? याचे कारण मनीष सिसोदिया यांनी सांगितले आहे. 

आम आदमी पार्टीचे सरकार आपल्या कामांचा हिशोब लोकांसमोर घेऊन जात आहे. विकास कामावर मतं मागत आहे. सामान्य जनता सरकारच्या कामांवर खूश आहे. याच कारणामुळे भाजपाच्या नेत्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून भीती वाटते, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. 

मनीष सिसोदिया यांनी काल (रविवारी) झालेल्या जनसभेत सुद्धा हेच कारण सांगितले. रविवारी मनीष सिसोदिया यांनी खिचडीपूर, मयूर विहार फेस-2, वेस्ट विनोदनगर, रेल्वे कॉलनी, मंडावली आणि बी ब्लॉक मंडावलीमध्ये जनसभा घेतली. तसेच, प्रत्येक सभेत मनीष सिसोदिया यांनी केजरीवाल सरकारने केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केले.

दुसरीकडे, दिल्लीतील विकासाच्या नावाखाली आपच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने येथील लोकांच्या डोळ्यात धूळ फेकल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला. 

केजरीवाल यांनी दिल्लीत 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सांगितले होते. मात्र, हे कॅमेरे कुठे लावले आहेत, याचा शोध दिल्लीतील जनता घेत आहे. वायफाय शोधता-शोधता लोकांच्या फोनमधील बॅटरी संपून जाते. पण, वायफाय काही मिळत नाही, असे सांगत अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे. 

(Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार')

(दिल्ली भाजपाचा सर्व्हे आला; उडू शकते केजरीवालांच्या आमदारांची झोप)

(चश्मा लावूनही शाळा, महाविद्यालय दिसत नाही; अमित शहा यांचा केजरीवालांना टोला)

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टी