दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार; ऑपरेशननंतर जुळ्या बहिणींना दिले नवीन आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 09:02 PM2023-07-26T21:02:47+5:302023-07-26T21:04:03+5:30

Aiims Delhi: जन्मापासून जोडलेल्या रिद्धी आणि सिद्धी वेगळ्या झाल्यामुळे आई-वडील खूप आनंदी आहेत.

delhi-aiims-two-sisters-were-separated-after-a-long-surgery | दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार; ऑपरेशननंतर जुळ्या बहिणींना दिले नवीन आयुष्य

दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार; ऑपरेशननंतर जुळ्या बहिणींना दिले नवीन आयुष्य

googlenewsNext

Aiims Delhi: आपण डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो. ही म्हण दिल्ली AIIMSच्या डॉक्टरांनी खरी ठरवली आहे. एम्सच्या डॉक्टरांनी 11 महिन्यांच्या जुळ्या मुलींवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्यांना नवजीनव दिले आहे. या दोघी जन्मापासून एकमेकींशी जोडलेल्या होत्या. त्यांना खूप त्रास व्हायचा. अखेर 9 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना वेगळे केले. रिद्धी-सिद्धी अशी या दोन बहिणींची नावे आहेत. शस्त्रक्रियेनंतर दोघांची प्रकृती स्थिर आहे.

रिद्धी-सिद्धी या दोघी बहिणींना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना इंडर ऑबजर्वेशन ठेवले आणि योग्य वेळ आल्यावर मुलींवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अनेक महिने वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. एम्सच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांच्या टीमच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुलींचे पोट आणि छाती जोडलेले होते

प्रोफेसर डॉ. मीनू वाजपेयी(एचओडी, बालरोग शस्त्रक्रिया विभाग, एम्स) यांनी सांगितले की, या बहिणींचे पोट आणि छाती जोडलेली होती. त्यामुळे या दोघींचे चेहरेही एकमेकींसमोर होते. मुलींना वळणे आणि झोपायलाही त्रास व्हायचा. 11 महिन्यांत त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये त्याच्या यकृताचा एक भाग दुसऱ्याशी जोडलेला असल्याचे आढळून आले.

मात्र, मुलींच्या हृदयाची कोणतीही धमनी जोडलेली नव्हती. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करण्याची योजना आखण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान प्रथम त्यांच्या यकृताचे काही भाग वेगळे करण्यात आले. त्यानंतर छातीचा भाग वेगळा करण्यात आला. मुलींना काही तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर दोघींना कोणताही त्रास झाला नाही. आता त्या निरोगी आहेत. एम्समध्ये गेल्या काही दिवसांत झालेली ही तिसरी मोठी शस्त्रक्रिया असल्याचे डॉ.मीनू यांनी सांगितले.

Web Title: delhi-aiims-two-sisters-were-separated-after-a-long-surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.